उद्धव ठाकरे यांची मोठी खेळी, भाजप आणि शिंदे गटाला प्रत्युत्तर देणार? दसऱ्या मेळाव्याआधी...

दसरा मेळावा शिवाजी पार्कातच घेण्यासाठी शिवसेना आग्रही

Updated: Sep 20, 2022, 02:38 PM IST
उद्धव ठाकरे यांची मोठी खेळी,  भाजप आणि शिंदे गटाला प्रत्युत्तर देणार? दसऱ्या मेळाव्याआधी...  title=

Maharashtra Politics : शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी जोरदार रणनीती आखली आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद सोडल्यापासून नवनव्या चेहऱ्यांना पक्षात प्रवेश दिला आहे. संभाजी ब्रिगेडसोबत (Sambhaji Bridget) युतीचा निर्णय देखील उद्धव ठाकरेंनी घेतला. अमित शाह (Amit Shah) यांनी काल केलेल्या टीकेला उद्धव ठाकरेंनी आज सूचक उत्तर दिलं आहे. ते शिवसेनेला संपवायला निघालेले आहेत, आता संघर्षाचा काळ आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

आता शिवसेना गटप्रमुखांचा 21 सप्टेंबरला गोरेगावातील नेस्को (Goregaon Nesco) इथं मेळावा होणार आहे. त्या मेळाव्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शिंदे गट (Shinde Group) यांच्याकडून त्यांनी केलेल्या टीकेला जाहीरपणे प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्याला महत्व प्राप्त झालं आहे

दसरा मेळाव शिवतीर्थावर?
दरम्यान, दसरा मेळावा (Dussehra Melava) शिवाजी पार्कातच (Shivaji Park) घेण्यासाठी शिवसेना आग्रही आहे. शिवसेनेचं शिष्टमंडळ मुंबईच्या जी नॉर्थ वॉर्डच्या अधिकाऱ्यांना भेटणार आहे. सगळ्यात आधी अर्ज दिल्यानंतरही परवानगी अजून दिलेली नाहीये. याबाबत विचारणा करण्यासाठी शिवसेनेचं शिष्टमंडळ अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.  शिवतीर्थावर दसरा मेळावा शिवसेनेचाच होणार असा विश्वास माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी व्यक्त केलाय. 

राष्ट्रवादी शिवसेनेच्या पाठिशी
शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच व्हावा यासाठी राष्ट्रवादीही (NCP0 शिवसेनेच्या पाठिशी आहे. दसरा मेळाव्यावरून राजकारण करणं हे दुर्दैव असून, महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी घटना असल्याचं सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) म्हटलंय. तर शिंदेंना बीकेसीचं मैदान (BKC Ground) दिलंय तर ठाकरेंनाच शिवतीर्थावर परवानगी द्यावी असं छगन भुजबळांनी म्हटलंय.