मुंबई : काही दिवसांपूर्वी मुंबईतील रेल्वे स्थानक आणि लोकल ट्रेनमध्ये अश्लिल हावभाव करणाऱ्या आरोपींना गजाआड करण्यात आलं होतं. त्यानंतर आता आणखीन एक धक्कादायक घटना मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये घडली आहे.
एका १४ वर्षांच्या मुलीनं एका तरुणाला घाबरुन धावत्या लोकलमधून उडी मारलीय. सीएसटी ती मश्जिद दरम्यान ही घटना घडली आहे.
१४ वर्षांची ही मुलगी रविवारी सकाळी साडे नऊ वाजता सीएसटीहून परळला जायला निघाली. कल्याण स्लो लोकलमध्ये ती बसली होती. सुट्टीचा दिवस असल्यानं तिच्या डब्यात कुणीच नव्हतं. त्याचवेळी गाडीत एक माणूस शिरला.
त्या मुलीनं तरुणाला डब्यातून उतरायला सांगितलं. पण त्यानं ऐकलं नाही. तिनं घाबरुन ट्रेनची साखळी खेचली पण ट्रेन थांबलीच नाही. अखेर त्या तरुणीनं घाबरुन उडी मारली.
ट्रेनमधून उडी मारल्याने ती तरुणी जखमी झाली. सध्या तिच्यावर मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
महिलांच्या डब्यात तरुण शिरल्याने तरुणीने लोकलमधून मारली उडी
मुंबईतील धक्कादायक घटना
तरुणीने लोकलमधून मारली उडी
ट्रेनची साखळी खेचली पण ट्रेन थांबलीच नाही