विसर्जनादरम्यान बुडालेल्या साईशचा मृतदेह सापडला

  लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान बुडालेल्या साईश मर्देचा मृतदेह सापडला. 

Updated: Sep 29, 2018, 03:44 PM IST
विसर्जनादरम्यान बुडालेल्या साईशचा मृतदेह सापडला

मुंबई :  लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान बुडालेल्या साईश मर्देचा मृतदेह सापडला. लालबागचा राजा विसर्जनाच्यावेळी बोट बुडाल्याचा प्रकार समोर आला होता. तेव्हापासून पाच वर्षीय साईश मर्दे बेपत्ता होता. गणेश विसर्जनाच्या दिवसापासून त्याच्या शोध सुरू होता. अखेर आज राजभवनाजवळच्या किनाऱ्यावर त्याचा मृतदेह सापडला. 

टीशर्टवरून ओळख 

विसर्जनाच्या दिवशी त्यानं घातलेल्या टी-शर्टवरून  त्याची ओळख पटलीय. साईशला शोधण्यासाठी नेव्ही डायवर्सचीदेखील मदत घेण्यात आली. 
सोमवारी लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान बोट पाण्यात उलटली होती. त्यावेळी साईश बुडाला होता.

वजन वाढल्याने बोट बु़डाली

वजन वाढल्यामुळे बोट बुडाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. बोटीमधले लोकं समुद्रात पडल्यानंतर लगेचच जीवन रक्षकांनी समुद्रात उड्या घेत या लोकांना वाचवलं होतं. पण सैयेश मर्दे बेपत्ता झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.