मुंबई : मुंबई भुवनेश्वर एक्सप्रेसला भीषण अपघात झाला आहे. आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ओरिसातील कटक येथील नेरगुंडी रेल्वे स्थानकाजवळ या एक्स्प्रेसचे ७ डबे कोसळले आहेत. यामध्ये ४० हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली आहे. रेल्वेने मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरु केले असून उच्च पदावरील अधिकारी देखील घटनास्थळी उपस्थित आहेत.
Odisha: Seven coaches derailed and several people injured after Lokmanya Tilak Express hits a guard van of a goods train near Salagaon at about 7 am today. pic.twitter.com/5w6xRXOzF7
— ANI (@ANI) January 16, 2020
मुंबईतील लोकमान्य टीळक टर्मिनस येथून ही एक्सप्रेस भुवनेश्वरला जात होती. या अपघातामागचे नेमके कारणं अद्याप स्पष्ट झाले नाही. तरी पहाटेच्यावेळी असलेल्या मोठ्या प्रमाणातील धुक्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. धुक्यामुळे दृश्यमान्यता कमी झाली आणि दुर्घटना घडली. या संदर्भात रेल्वेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.