मुंबई : 'अवजड वाहन प्रवेशबंदीमधून खासगी बसेसना वगळण्याची मागणी करत आज मुंबई बस चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची घेतलीय.
खासगी बसवरील निर्बंध हटवण्याबाबत मुंबई बस चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकरांची भेट घेतली. यावेळी वाहतूक सहआयुक्त अमितेश कुमारही उपस्थित होते. या प्रकरणी नेमके काय करता येऊ शकतं ते पाहू, असं पोलीस आयुक्तांनी सांगितलंय.
निर्बंध उठवले नाहीत तर १९ आणि २० तारखेला तीव्र आंदोलनाचा इशारा बस चालक संघटनेनं दिलाय.
मुंबईत सकाळी ७ ते ११ आणि संध्याकाळी ५ ते रात्री १० पर्यंत ही प्रवेशबंदी असेल. तर दक्षिण मुंबईत सकाळी ७ ते रात्री १२ पर्यंत अवजड वाहनांना तसंच प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी बसेना प्रवेश बंदी करण्यात आलीय. हा प्रयोग पुढील दोन महिने करण्यात येणार आहे.
मुंबई शहरात दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढ असून त्यातच मेट्रोसह विविध मोठ्या प्रकल्पांचं काम सुरु आहे. त्यात अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होतेय. या निर्णयामुळे मुंबईतील ट्रॅफिकची समस्या काही अंशी कमी होईल असं वाहतूक विभागाचं म्हणणं आहे.