मुंबई : मुंबईत कोरोनाच्या (Corona Cases in Mumbai) वाढत्या रुग्णसंख्येची आकडेवारी धडकी भरवणारी आहे. गेल्या चोवीस तासात मुंबईत 20 हजार 181 रुग्णांची नोंद झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने (BMC) खासगी रूग्णालयांसाठी नवी नियमावली (BMC has issued Guidelines) जारी केली आहे.
परवानगीशिवाय कोविड रूग्णाला (Covid Patients) दाखल करू नका असे निर्देश बीएमसीने दिले आहे. दुसऱ्या लाटेवेळी जितक्या क्षमतेने रुग्णालयात बेड्सची व्यवस्था होती तेवढीच पुन्हा सक्रीय ठेवण्याचे निर्देश महापालिकेने हॉस्पिटलला दिले आहेत. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे बीएमसी सतर्क झाली आहे.
खासगी रुग्णालयांना 80 टक्के कोविड बेडची उपलब्धता ठेवण्याबरोबरच सरकारने निर्देशित केलेल दर आकारणं खासगी रुग्णालयांना बंधनकारक असणार आहे.
खासगी रुग्णालयांनी 80 टक्के कोविड बेड आणि 100 आयसीयू बेडसह वॉर्ड रुम उघडावेत. वॉर्ड रुम आरक्षित असतील. तसंच बीएमसीच्या परवानगीशिवाय इथं कोणत्याही रुग्णाला भरती करता येणार नाही, असे निर्देशही पालिका प्रशासनाने दिले आहेत.