एअरहोस्टेस हत्या प्रकरण : चड्डीने गळफास घेऊन आरोपीने लॉकअपमध्येच स्वत:ला संपवलं

Mumbai Crime : मुंबईत चार दिवसांपूर्वी एका 23 वर्षीय एअरहोस्टेसची राहत्या घरात गळा चिरून हत्या करण्यात आली होती. त्याप्रकरणी एका आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. मात्र आता या आरोपीने पोलीस कोठडीमध्येच स्वतःला संपवले आहे.

आकाश नेटके | Updated: Sep 8, 2023, 11:32 AM IST
एअरहोस्टेस हत्या प्रकरण : चड्डीने गळफास घेऊन आरोपीने लॉकअपमध्येच स्वत:ला संपवलं title=

Mumbai Crime : चार दिवसांपूर्वी मुंबईत (Mumbai News) रुपल ओग्रे (Rupal Oghre) नावाच्या एअरहोस्टेची हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) याप्रकरणात एका सफाई कर्मचाऱ्याला अटक केली होती. आरोपीने गळा चिरून रुपची हत्या केली होती. पोलिसांनी अवघ्या 12 तासांत आरोपील ताब्यात घेत अटक केली होती. त्यानंतर आता या आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

मुंबईतील पवई परिसरात एअर होस्टेसच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीने लॉकअपमध्ये आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. लॉकअपमध्ये कैद असलेल्या आरोपीने चड्डीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी आरोपीचा मृतदेह लॉकअपमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.आरोपी हे मृत एअर होस्टेसच्या सोसायटीत साफसफाईचे काम करायचे. आरोपीने हा खून का केला याचा तपास पोलीस करत असून नुकतेच त्याला लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते.

आरोपी 35 वर्षीय विक्रम अटवालने (40) आत्महत्या केल्याचं उघडकीस आलं आहे.पवई पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर त्याला अंधेरी पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आलं होतं. अंधेरी पोलीस ठाण्यामध्येच लॉकअपमध्ये गळफास घेऊन आरोपीने आत्महत्या केली आहे. आज आरोपी अटवालची न्यायालयात त्याची पेशी होणार होती. मात्र त्याआधीच विक्रमने स्वच्छता गृहात पॅंटच्या सहाय्याने गळफास घेतला.

आरोपी विक्रमने 3 सप्टेंबर रोजी गळ्यावर वार करून  23 वर्षीय एअरहॉस्टेस रूपल ओग्रेयची हत्या केली होती. आरोपी विक्रम हा त्याच इमारतीत करायचा साफ सफाईचं काम करत होता. हत्येच्या दोन दिवस आधी दोघांमध्ये वाद झाला होता. चेहरा आणि हातावरील जखमांमुळे पोलिसांचा आरोपीवरील संशय बळावला होता. कसून चौकशी केली असता आरोपीने आपला गुन्हा कबुल केला आहे.

विक्रमने एअरहोस्टेस रुपलची हत्या केल्यानंतर  चाकू आणि त्यादिवशी घातलेले कपडे हे इमारतीच्या झुडुपांमध्ये फेकले होते. विक्रमला अटक करण्यात आल्यानंतर 8 सप्टेंबरपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. एअरहोस्टेसची हत्या करण्यापूर्वी तीन दिवस आधीच विक्रमने हा चाकू विकत घेतला होता असा पोलिसांना संशय आहे. 

बलात्काराच्या उद्देशानेच शिरला होता घरात

आरोपी अटवाल आणि रुपलमध्ये शुक्रवारी आणि रविवारी सकाळी शाब्दिक वाद झाला होता. त्यानंतर रविवारी तो तिच्या घरात शिरला होता. आरोपीने त्याच्या कपड्याच्या आत सुरा लपवला होता. पीडितेवर बलात्कार करण्याच्या उद्देशाने तो घरात घुसला. पण रुपलने त्याचा प्रतिकार केल्याने घाबरून विक्रमने तिचा गळा चिरला.