Mumbai Crime : मानसिक तणावातून शेजारच्यांवर हल्ला, पाच जणांवर चाकूने वार, दोघांचा मृत्यू

मुंबईतल्या ग्रँटरोड भागात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक व्यक्तीने शेजारी राहणाऱ्यांवर हल्ला केला. यात दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. डी बी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. 

Updated: Mar 24, 2023, 07:06 PM IST
Mumbai Crime : मानसिक तणावातून शेजारच्यांवर हल्ला, पाच जणांवर चाकूने वार, दोघांचा मृत्यू

Mumbai Crime :  मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मानसिक तणावातून एका व्यक्तीने शेजाऱ्यांवर (Neighbors) चाकूने हल्ला (Stabbed) केला. पाच जणांवर त्याने चाकूने हल्ला केला, यात दोघांचा मृत्यू झालाय तर तीन जण गंभीर जखमी झाल आहेत. चेतन गाला असं आरोपी व्यक्तीचं नाव असल्याची माहिती मिळतेय. कौटुंबिक तणावामुळे (Family Stress) चेतन गाला गेल्या काही दिवसांपासून तणावात होता. कौटुंबिक वादाला शेजारचे जबाबदार असल्याच्या शक्यतेवरुन त्याने शेजारच्यांवर हल्ला केला. यात एका जोडप्याचा मृत्यू झाला आहे. 

काय आहे नेमकी घटना?
डीबी मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत पार्वती मेन्शन नावाची इमारत आहे. या इमारतीत चेतन गाला हा 54 वर्षांचा व्यक्ती राहातो. चेतन गाला गेल्या काही दिवसांपासून तणावात होता. कुटुंब सोडून गेल्यामुळे तो त्रस्त होता. शेजारच्यांमुळे आपलं कुटुंब सोडून गेलं असं त्याला वाटत होतं. त्याच रागात त्याने दुपारी साडेतीनच्या सुमारास शेजारी राहाणाऱ्या मेस्त्री कुटुंबावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात जयेंद्र मेस्त्री आणि निला मेस्त्री या पती-पत्नीचा मृत्यू झाला. 

त्यानंतर त्याने आणखी तिघांवर हल्ला केला. या हल्ल्यात तिघंही गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर एच.एन रिलायन्स हॉस्पीटल तसंच नायर हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. पोलिसांनी आरोपी चेतन गाला याला ताब्यात घेतलं असून पोलीस अधिक तपास करत आहेत.