मुंबई : शहराचा विकास आराखडा महापालिकेत मंजूर झालाय. रात्री सव्वा एक वाजता महापालिकेत या डीपीला मंजुरी मिळाली.
२०३४पर्यंतचा हा विकास आराखडा आहे. २००९ सालापासून या विकास आराखड्यावर चर्चा आणि प्रक्रिया सुरू होती. अखेर आठ वर्षांनी हा विकास आराखडा मंजूर झालाय.
मंजूर झालेला विकास आराखडा आता राज्य सरकारच्या मंजुरीसाठी जाणार आहे. ६ महिन्यांच्या मुदतीत राज्याचा नगरविकास विभाग याला मंजुरी देईल. दरम्यान शिवसेनेने ७८, भाजपने १०४, काँग्रेसने २५ दुरुस्त्या नव्या डीपीमध्ये सुचवल्या आहेत.