close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

२० तासांनंतरही गटारात पडलेल्या चिमुकल्या दिव्यांशचा शोध सुरू

गेली दोन वर्षं या गटारावर झाकण नाही. स्थानिकांनी तक्रारी करुनही त्याची दखल घेतली नाही

Updated: Jul 11, 2019, 08:20 PM IST
२० तासांनंतरही गटारात पडलेल्या चिमुकल्या दिव्यांशचा शोध सुरू

गणेश कवडे / राकेश त्रिवेदी, झी २४ तास, मुंबई : गोरेगावमध्ये गटारात पडलेल्या दीड वर्षाच्या दिव्यांशचा शोध सुरूच आहे. बुधवारी रात्री दिव्यांश उघड्या गटारात पडला...  जवळपास २० तास उलटले तरी तो अद्याप सापडलेला नाही. मुंबई महापालिकेचा निष्काळजीपणा मुंबईकरांच्या जीवावर उठलाय, हेच यातून दिसतंय.

महापालिकेचा अक्षम्य निष्काळजीपणा

महापालिकेचं पाप दीड वर्षाच्या दिव्यांशच्या जीवावर उठलंय. गोरेगाव पूर्व आंबेडकर नगर भागातली ही दुर्घटना... रात्री दहाच्या सुमारास दिव्यांश सिंह घराबाहेर चालता चालता उघड्या गटारात पडला... आणि रात्रीपासून शोधमोहीम सुरू झाली.

ज्या गटारात दिव्यांश पडला ते ३ ते ४ फूट खोल होतं, त्यातच पावसामुळे पाण्याचा प्रवाह जोरात होता. गेली दोन वर्षं या गटारावर झाकण नाही. स्थानिकांनी तक्रारी करुनही त्याची दखल घेतली नाही.

Image result for divyansh manhole mumbai
दिव्यांश सिंह 

महापौरांची बोलती बंद

घटनास्थळी महापौर पोहोचताच माध्यमांनी घेराव घालणं सहजिकच होतं. यावेळी जबाबदारी घेणं सोडा महापौरांनी 'झी मीडिया'च्या प्रतिनिधींनाच धक्का मारण्याचा प्रयत्न केला... 'झी मीडिया'च्या प्रश्नांच्या सरबत्तीवर महापौरांची बोलती पुरती बंद झाली.

मुंबईमध्ये गेल्या साडे पाच वर्षांत मॅनहोल्स, गटार आणि समुद्रामध्ये बुडण्याच्या तब्बल ६३९ दुर्घटना घडल्यायत. यामध्ये ३२८ लोकांचा मृत्यू झालाय. कुठलीही दुर्घटना घडली की महापालिका करते चौकशी... तशीच चौकशी याही प्रकरणाची होणार आहे. पण चौकशी करण्याऐवजी आधी खबरदारी घ्यावी लागते, हे किती बळींनंतर महापालिकेला समजणार आहे.