गर्भनिरोधक गोळ्यांऐवजी कंडोमचा वापर दुप्पट

 नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेमधून ही बाब समोर

Updated: Dec 22, 2020, 09:35 AM IST
गर्भनिरोधक गोळ्यांऐवजी कंडोमचा वापर दुप्पट title=

मुंबई : मुंबईत फॅमिली प्लॅनिंगसाठी गर्भनिरोधक गोळ्यांऐवजी कंडोमचा वापर दुप्पट झाल्याची बाब उघडकीस आली आहे. गर्भनिरोधक गोळ्यांसोबतच महिलांच्या नसबंदीच्या प्रमाणातही घट झालीय. मुंबई उपनगरांमध्ये कंडोमचा वावर ८.९ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर गेला. कंडोमचा वापर ११.७ टक्क्यांवरून वाढून १८.१ टक्के झालाय. तर गर्भनिरोधक गोळ्या घेण्याचं प्रमाणही ३.१ टक्क्यांवरून कमी होऊन १.९ टक्क्यांवर आलं आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेमधून ही बाब समोर आली आहे. 

देशातील एकूण २२ राज्यांमध्ये सर्व्हे करण्यात आला. मुंबईतील १० पैकी ७ विवाहित जोडपी पहिल्यापासूनच कुटुंब नियोजनाच्या पद्धतीशी जोडले गेल्याचं दिसून आलं. मुंबई शहरातील कंडोम विक्रीचे प्रमाण तुलनेत वाढल्याचे दिसून आले. नवविवाहीत जोडप्यांनी कंडोमला जास्त प्राधान्य दिले. पुरुष वर्गाकडून कंडोमची मोठ्या प्रमाणात मागणी होतेय. दरम्यान गर्भनिरोधक गोळ्यांच्या विक्रीत घट झाल्याचे दिसून आले. राज्यातील शहर आणि जिल्हास्तरावरील सर्व्हेक्षणात हा बदल जाणवला. 

या सर्व्हेक्षणातून फॅमिली प्लानिंगमध्ये पुरुषांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येते. दहापैकी २ पुरुष कंडोम वापरत असल्याचे निष्पन्न झाले. कंडोम युजर्सचे प्रमाण ७.१ वरुन वाढून १० पर्यंत गेले. नसबंदी आणि गर्भनिरोधक गोळ्या घेणाऱ्यांचे प्रमाण ५०.७ वरुन ४९.१ वर पोहोचले.