FIRE | मुंबईत आगीचे सत्र सुरूच; गोरेगावमध्ये कपड्यांच्या दुकानांना आग

मुंबईतील गोरेगाव पश्चिम परिसरात 7 कपड्यांच्या दुकानाला भीषण आग लागल्याची माहिती मिळतेय. 

Updated: Mar 30, 2021, 11:09 AM IST
FIRE | मुंबईत आगीचे सत्र सुरूच; गोरेगावमध्ये कपड्यांच्या दुकानांना आग title=

गोरेगाव :  मुंबईतील गोरेगाव पश्चिम परिसरात 7 कपड्यांच्या दुकानाला भीषण आग लागल्याची माहिती मिळतेय. 

 गोरेगाव पश्चिम परिसरात लागलेल्या आगीत 7 दुकाने जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे  4 पाण्याचे बंब दाखल झाले आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

मुंबईत आगी लागण्याचे सत्र सुरूच आहे. नेहमीच मुंबईच्या कुठल्यातरी भागात आगीच्या घटना घडत असतात. गेल्या आठवड्यातच भांडूप येथील ड्रीम मॉलला लागलेल्या आगीत 400 गाळेधारकांचे नुकसान झाले आहे. तसेच येथे असलेल्या कोव्हिड सेंटरदेखील जळून खाक झाले होते. त्यामुळे मुंबईतील आगीच्या  घटनांबाबत नागरिकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 
 

 ( बातमी अपडेट होत आहे...)