सोशल मीडियावर पैशांसोबत व्हीडिओ नकोचं, नाहीतर तुम्हालाही पोलिस चौकशीला जावे लागेल

 मुंबईतील डोंगरी येथे राहणाऱ्या एका गुंडाचा व्हीडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Updated: May 29, 2021, 08:42 PM IST
सोशल मीडियावर पैशांसोबत व्हीडिओ नकोचं, नाहीतर तुम्हालाही पोलिस चौकशीला जावे लागेल title=

मुंबई (डोंगरी) : मुंबईतील डोंगरी येथे राहणाऱ्या एका गुंडाचा व्हीडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्या गुंडाने अपलोड केलेल्या त्या व्हीडिओमध्ये कोट्यवधी रुपये  दिसत होते, त्यामुळे हा व्हीडिओ जेव्हा मुंबई पोलिसांनी पाहिला तेव्हा त्या गुंड्याला पोलिसांनी त्या गुंडाला नोटीस पाठवली. त्यांनी या नोटीसच्या माध्यमातून त्या गुंडाला इतके पैसे कुठून आले याचा जवाब मागितला आहे.

व्हायरल व्हीडिओमध्ये गुंड त्याच्या मांडीवर एका लहान मुलाला घेऊन बसला आहे. त्याच्या समोर 500 आणि 2 हजार रुपयांच्या नोटींचे बंडल आहेत. व्हीडिओमध्ये मुलाच्या हातात देखील या नोटांचा गठ्ठा आहे. हा व्हीडिओ पाहिल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या मनात एकच प्रश्न पडला आहे की, एखाद्या व्यक्तीकडे इतके पैसे आले कसे?

पोलिसांनी जेव्हा व्हायरल झालेल्या व्हीडिओची तपासणी केली, तेव्हा त्यांना कळाले की, हा व्हीडिओ मुंबईच्या डोंगरी भागातील गुंड शम्स सय्यदचा आहे. पोलिसांनी सांगितले की, शम्सवर मुंबईतील अनेक पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आता शम्सला चौकशीसाठी बोलावले आहे.

खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हाची देखील नोंद

डीसीपी एन चैतन्य यांनी सांगितले की, "या व्हीडिओची तपासणी केल्यानंतर आम्ही शम्सला नोटीस बजावली आहे. व्हाडिओमध्ये दिसणार्‍या व्यक्तीला (शम्स) इतके पैसे कुठून आणि कसे आले याचे उत्तर आम्ही मागितले आहे. त्याच बरोबर त्याला पोलिस चौकशीसाठी देखील बोलवण्यात आली आहे." डीसीपी एन चैतन्य यांनी पुढे सांगितले की, शम्स सय्यद विरोधात मुंबईत दहापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. यामध्ये त्याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा देखील दाखल आहे.