38 Hour Harbour Line Mega Block: मुंबईकरांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेकडून हार्बर मार्गावर (Harbour Line) तब्बल 38 तासांचा मेगाब्लॉक (Mega Block) घेण्यात आला आहे. हार्बर मार्गावरील लोकल आता थेट 2 ऑक्टोबरला दुपारी 1 नंतर सुरु होणार आहे. बेलापूर (Belapur) आणि पनवेल (Panvel) स्थानकांमधली वाहतूक शनिवारी रात्री 11 ते सोमवारी दुपारी 1 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद आहेत.
#NaviMumbai: #Mumbai#Alert #MegaBlock
38-Hour Closure Between #Belapur and #Panvel For Dedicated Freight Corridor Expansion
NO LOCAL TRAINS BETWEEN BELAPUR & PANVEL ON HARBOUR & TRANS-HARBOUR LINE
Begins Saturday 30/09/2023 night 11.00 pm to Monday 02/10/2023 aft 1.00 pm.… pic.twitter.com/8cKodUmJhC
— मुंबई Matters™ (@mumbaimatterz) September 29, 2023
पनवेल उपनगरीय यार्डच्या पुनर्निर्माण कामासाठी, पश्चिम समर्पित फ्रेट कॉरिडॉरसाठी अप आणि डाउन 2 नवीन लाईनच्या बांधकामासाठी या ब्लॉक दरम्यान करण्यात येतं आहे. (mumbai local train 38 hour mega block Harbour Line service will be closed till 2 october )
हार्बर मार्गावरील अप आणि डाऊन उपनगरीय सेवा बेलापूर, नेरूळ आणि वाशी स्थानकांपर्यंत (Mumbai News) सुरु असणार आहे. तर ट्रान्सहार्बर मार्गावर अप आणि डाऊन उपनगरीय सेवा केवळ ठाणे आणि नेरुळ/वाशी स्टेशनदरम्यान लोकल धावणार आहेत.
- 2 ऑक्टोबरला सीएसएमटीहून पनवेलसाठी पहिली लोकल 12 वाजून 8 मिनिटांनी धावणार आहे. ही लोकल 1 वाजून 29 मिनिटांनी पनवेल स्टेशनला पोहोचणार आहे.
- 2 ऑक्टोबरला पनवेलहून सीएसएमटीकडे जाणारी पहिली लोकल1 वाजून 37 मिनिटांनी धावणार आहे. तर ही लोकल 2 वाजून 56 मिनिटांनी सीएसएमटी स्थानकात पोहोचणार आहे.
- 2 ऑक्टोबरला ठाण्याहून पनवेलसाठी पहिली लोकल 1 वाजून 24 मिनिटांनी सुटणार असून ती 2 वाजून 16 मिनिटांनी पनवेलला दाखल होणार आहे.
- 2 ऑक्टोबरला पनवेलहून ठाण्यासाठी पहिली लोकल 2 वाजून 1 मिनिटांनी धावणार असून ती 2 वाजून 54 मिनिटांनी ठाण्यात पोहोचणार आहे.
हार्बर मार्गावर 38 तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आल्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार नाही. त्यामुळे मध्य आणि पश्चिम मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.