मुंबईकरांनो आता तुमची लोकल वेळेतच स्थानकात येणार, मध्य रेल्वेने केले मोठे बदल!

Mumbai Local Train Update: गेल्या काही दिवसांपासून मुंबई लोकलचे वेळापत्रक बिघडले आहे. मात्र लवकरच आता ट्रेनचे वेळापत्रक पुन्हा पुर्ववत होणार आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Jun 18, 2024, 12:08 PM IST
मुंबईकरांनो आता तुमची लोकल वेळेतच स्थानकात येणार, मध्य रेल्वेने केले मोठे बदल! title=
mumbai local train update No Train Late After Software Problem Solve From Delhi

Mumbai Local Train Update: लोकल ही मुंबईकरांची लाइफलाइन आहे. नियोजीत लोकलला थोडासा वेळ जरी झाला तरी मुंबईकरांच्या संपूर्ण टाइमटेबल विस्कळीत होते. गेल्या काही दिवसांपासून लोकल उशीराने धावत आहेत. त्यामुळं त्याचा फटका सर्वसामान्यांना बसतो आहे. लोकल उशीरा असल्याने हाफ-डे किंवा लेट मार्क बसतो आहे. मात्र, या समस्येवर आता मध्य रेल्वेने उपाययोजना हाती घेतली आहे. मध्य रेल्वेवर अखेर 15 दिवसांनंतर ट्रेनची स्थिती सुधारणार आहे. दिल्लीहून रेल्वे बोर्डाकडून मध्य रेल्वे प्रशासनाला सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यास परवानगी दिली आहे. रविवारी रात्री सिस्टिममध्ये बदल करण्यात आले आहे. त्यानंतर सोमवारी त्याचे परिणाम दिसणार होते. मात्र, सोमवारी सुट्टी असल्याने मध्य रेल्वेच्या सुट्टीकालीन वेळापत्रकावरल लोकल धावत होत्या. मध्य रेल्वेच्या या बदलाचा फायदा मंगळवारी होणार का हे पाहायला मिळणार आहे. 

2 जून रोजी रूट रिले इंटरलॉकिंगचे (आरआरआई) काम पूर्ण झाल्यानंतर ट्रेनच्या वाहतुकीला फटका बसला होता. दादर ते सीएसएमटी मार्गावर लोकल उशीराने धावत होत्या. येथे लोकलचे थोडेसे अंतर कापण्यासाठीही 40-50 मिनिटे लागत होते. लोकलला लवकर सिग्नल मिळत नसल्याने ट्रेन उशीराने धावत होत्या. या नवीन प्रणालीमध्ये सुरक्षेवर अधिक भर देण्यात आला होता. आता सॉफ्टवेअरमध्ये बदल केल्यानंतर लोकल क्रॉसओव्हर पॉईंटमधून गेल्यावर, 2 ट्रॅक सर्किट पॉईंटपासून सुमारे 250 मीटरचे अंतर पार केल्यानंतर, प्रभावित भागात थांबलेल्या लोकलला प्रथम पिवळा सिग्नल दिला जाईल. त्या नंतर ग्रीन सिग्नल मिळेल. आरआरआयचे काम पूर्ण होण्यापूर्वी, जर एखादी ट्रेन क्रॉसओव्हर पॉईंटच्या 70 मीटर पुढे गेली, तर मागाहून येणाऱ्या ट्रेनला सिग्नल मिळेल. म्हणजेच, गाडी 70 मीटर पुढे गेल्यानंतर दुसरी गाडी चालवण्यात येईल. 

रेल्वे बोर्डकडून मंजूरी मिळाल्यानंतर सॉफ्टवेअरमध्ये काही गरजेचे बदल करण्यात आले आहेत. आता पहिल्याप्रमाणे ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम होणार नाही. या बदलानंतर ट्रेनच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार नाही, याची अपेक्षा आहे, असं रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकार्यांनी म्हटलं आहे. 

दरम्यान, ज्या नियमामुळं मुंबईतील लोकलचे वेळापत्रक बदलले होते. तो नियम सुरक्षिततेसाठीच लागू करण्यात आला होता. खासकरुन बालासोरसारखी घटना घडल्यानंतर असे नियम कठोर करण्यात आले होते. या नियम पॅन इंडियासाठी करण्यात आला होता. पण मुंबईसारख्या शहरात जिथे लोकलचे मोठे जाळे पसरले आहे तिथे या नियमांची अंमलबजावणी करणे कठिण जात होते. कारण, सीएसएमटी यार्डमध्येच सीएसएमटी यार्डमध्येच जवळपास १०० क्रॉसओव्हर पॉइंट आहेत. येथून दररोज सुमारे 1500 गाड्या धावतात, अशा स्थितीत 250 मीटर अंतरापर्यंत ट्रेनची वाट पाहणे प्रशासनासाठी डोकेदुखी ठरली होती.