मुंबई: बोरिवली परिसरातील नागरिकांमध्ये सध्या मधमाशांची दहशत पसरली आहे. काही दिवसांपूर्वी येथील वीर सावरकर उद्यानात मधमाशांना काही नागरिकांवर हल्ला केला होता. यामध्ये तीन जण जखमी झाले होते. यापैकी पंकज शहा यांचा नुकताच मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर बोरिवली पश्चिमेतील श्री सिद्धीविनायक सोसायटीत एका कामगारावर मधमाशांनी हल्ला केल्याचा प्रकार घडला. मधमाशांकडून अशाप्रकारे होत असलेल्या जीवघेण्या हल्ल्यांमुळे बोरिवलीकर सध्या धास्तावले आहेत.
मुंबईत मधमाशांचं प्रमाण वाढल्याचं महापालिकेनंही मान्य केले आहे. पावसामुळे मधमाशा जास्त प्रमाणात बाहेर येतात. त्यामुळे नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. तर नागरिकांनी मधमाशांच्या बंदोबस्तासाठी महापालिकेत विशेष विभाग असावा, अशीही मागणी केली आहे.