close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मानखुर्दमध्ये पोलिसांच्या गाडीवर दगडफेक

 मानखुर्दमध्ये पोलिसांच्या गाडीवर दगडफेक

Updated: Sep 23, 2019, 06:33 PM IST
मानखुर्दमध्ये पोलिसांच्या गाडीवर दगडफेक

प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई : मानखुर्दमध्ये पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. यामध्ये एक पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. संतप्त जमावाने पोलिसांच्या गाडीवर ही दगडफेक केली होती. मुलं पळवणाच्या आरोप करत संतप्त जमाव संशयित महिलेला अद्दल घडवण्याच्या मागावर होता. त्यावेळी ही घटना घडली.

महिला येऊन मुलं पळवते अशी बातमी गेले काही दिवस मानखुर्दमध्ये पसरत आहे. यासंदर्भात संशयित महिलेला नागरिकांनी हेरले. पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी गाडीतून नेण्यात येत होते. जमावाकडून काही संतप्त प्रतिक्रिया येऊ नये म्हणून पोलिसांनी या महिलेस संरक्षण पुरवत पुढील कार्यवाहीसाठी गाडीत नेले. गाडी पुढे जात असताना नागरिकांना संताप अनावर झाला आणि ही प्रतिक्रिया उमटली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगण्यात येत आहे.