मुंबई : राज्यात गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनाच जोर ओसरला आहे. सातत्याने रुग्णसंख्येमध्ये कमालीची घट झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सराकरने ब्रेक द चेननुसार (Break The Chain) राज्यात अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. राज्य एकूण 5 टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे. मुंबई मनपा क्षेत्र तिसऱ्या टप्प्यामध्ये आहे. दरम्यान मुंबईसाठी महापालिकेने (Mumbai Unlock) नवी नियमावली जाहीर केली आहे. मुंबई महानगरपालिकेने या नियमावलीमध्ये अनेक निर्बंध शिथील केले आहेत. या सर्व नियमांची अंमलबजावणी ही 7 जूनपासून करण्यात येणार आहे. (Mumbai Municipal Corporation has announced new rules as per break the chain)
काय सुरु काय बंद?
नव्या नियमावलीनुसार, मुंबईतील अत्यावश्यक सेवेत असलेले आणि इतर दुकानं ही सोमवार-शुक्रवार दरम्यान सकाळपासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील. तर शनिवार आणि रविवारी अत्यावश्यक सेवांचा अपवाद वगळता सर्व दुकानं बंद राहतील. हॉटेल्स 50 टक्के क्षमतेने सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यानुसार हॉटेल्स संध्याकाळी 4 वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहे. तर यानंतर नेहमीप्रमाणे होम डिलिव्हरी सेवा देता येणार आहे.
कोविड-१९ सकारात्मक दर व ऑक्सिजन बेड व्याप्ती दर,या निकषांनुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्र लेव्हल 3 मध्ये येत असून त्यात,राज्य शासनाने ५/०६/२१ रोजी जाहीर केलेले नियम ७ जून २१ पासून लागू होतील
नागरिकांनी अनलॉक ची प्रक्रिया सर्व नियमांचे पालन करत पार पाडावी असे आवाहन आम्ही करतो pic.twitter.com/YHNQfl9oFN— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 5, 2021
सार्वजनिक उद्यानं, मैदान सकाळी 5 ते 9 दरम्यान सुरु राहतील. तर खासगी कार्यलयं ही 50 टक्के क्षमतेने सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. सार्वजनिक कार्यक्रमांना 50 टक्के उपस्थितींची अट घालून परवानगी देण्यात आली आहे. मात्र ही परवानगी केवळ 4 वाजेपर्यंत असणार आहे. तर लग्न सोहळ्याला 50 तसेच अंत्यसंस्काराला 20 जणांची मुभा देण्यात आली आहे.
लोकल रेल्वेचं काय?
या नव्या नियमावलीत मुंबई लोकलमध्ये (Mumbai Local) सर्वसामन्यांना प्रवेश नसणार आहे. आधी प्रमाणेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच रेल्वेतून प्रवास करता येणार आहे. त्यामुळे सर्वसामन्यांना लोकल प्रवासासाठी आणखी वाट पाहावी लागणार आहे.
पूर्ण क्षमतेने बेस्ट प्रवास
दरम्यान बेस्ट बसची वाहतूक पूर्ण क्षमतेने करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण प्रवाशांना बसमध्ये उभ्याने प्रवास करता येणार नाही. बेस्टने या संदर्भात ट्विट करत माहिती दिली आहे. याआधी आतापर्यंत बेस्टमध्ये एका सीटवर एकाच प्रवाशाला बसण्याची परवानगी होती.
संबंधित बातम्या :