मुंबई : राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत (Corona) दिवसेंदिवस कमालीची घट पाहायला मिळत आहेत. गेल्या 2 महिन्यात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातलं होतं. मात्र आता आरोग्य यंत्रणांच्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. राज्यात आज (5 जुलै) 13 हजार 659 नवे कोरोना बाधित सापडले आहेत. तर 24 तासात 21 हजार 776 रुग्ण बरे झाले आहेत. तर 300 जणांचा दिवसभरात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. (Today 5 June 2021 13 thousand 659 patients of Corona have been found in Maharashtra)
राज्याचे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) गेल्या तीन महिन्यात आज प्रथमच ९५ टक्क्यांवर गेले आहे. आज दिवसभरात कोरोनाचे २१ हजार ७७६ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले. आतापर्यंत एकूण ५५ लाख २८ हजार ८३४ जण कोरोना मुक्त झाले आहेत. दरम्यान,
— Rajesh Tope (@rajeshtope11) June 5, 2021
राज्यात आजपर्यंत एकूण 55 लाख 28 हजार 834 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1 लाख 88 हजार 27 इतके सक्रीय रुग्ण आहेत. म्हणजेच या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.01% इतके झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर 1.71% एवढा आहे. सध्या राज्यात 14,00,052 व्यक्ती या होम क्वारंटाईन आहेत. तर 7 हजार 93 जणं संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
3 महिन्यांनतर सर्वात कमी रुग्ण
विशेष म्हणजे राज्यात आज गेल्या 3 महिन्यानंतर सर्वात कमी रुग्ण आढळले आहेत. याआधी 10 मार्चला इतकेच म्हणजेच 13 हजार 659 नवे कोरोना बाधित सापडले होते.
मुंबईत किती रुग्ण?
तसेच मुंबईतही कोरोना रुग्ण संख्येत घट झालेली आहे. मुंबईत दिवसभरात 866 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 1 हजार 45 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहे. तर मुंबईत आता 16 हजार 133 सक्रीय रुग्ण आहेत. मुंबईत आतापर्यंत एकूण 6 लाख 77 हजार 445 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
#CoronavirusUpdates
५ जून, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण - ८६६
२४ तासात बरे झालेले रुग्ण - १०४५
बरे झालेले एकूण रुग्ण - ६७७४४५
बरे झालेल्या रुग्णांचा दर - ९५%एकूण सक्रिय रुग्ण- १६१३३
दुप्पटीचा दर- ५११ दिवस
कोविड वाढीचा दर ( २९ मे ते ४ जून)- ०.१३ % #NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) June 5, 2021
मुंबईतील रुग्ण बरं होण्याचा दर हा 95 टक्के इतका झाला आहे. तर कोरोना दुप्पटीचा दर हा 511 दिवसांवर पोहचला आहे.
संबंधित बातम्या :
Unlock : मुंबईत लोकल सेवा कधी सुरु होणार, काय म्हणाल्या महापौर पेडणेकर !
सोशल मीडियावर जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट अकाऊंट, मित्रांकडे केली पैशाची मागणी