Mumbai news : मुंबईकरांनो मेट्रोसंदर्भात मोठी बातमी

Mumbai Metro : मुंबईकरांनो जर तुम्ही आज मेट्रोन प्रवास करणार असाल तर आधी ही बातमी वाचा. कारण लोकलपाठोपाठ मेट्रोने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचे हाल होण्याची शक्यता आहे. 

Updated: Jan 8, 2023, 07:55 AM IST
Mumbai news : मुंबईकरांनो मेट्रोसंदर्भात मोठी बातमी title=
Mumbai news first metro Mega Block today Sunday 8 January 2023 megablock on Line 2A and 7 marathi news

Mega Block in Metro Line : मुंबईकरांसाठी (Mumbai News) लोकल ही त्यांची लाइफलाइन...एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी सगळ्यात जलद प्रवास म्हणजे लोकल (local Mega Block). त्यामुळे संपूर्ण मुंबईकर लोकलने प्रवास करतात असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. मुंबईकरांचा प्रवास जलद आणि सुखकर करण्यासाठी मुंबईत लोकलसोबतच (Mumbai local News) मेट्रोही (Metro) काही मार्गावर धावते. जर तुम्ही नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी घराबाहेर पडणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. ज्याप्रकारे मध्य (Central Line) हार्बर (Harbor Line) आणि पश्चिम मार्गावर (Western Line) आज मेगाब्लॉक घेण्यात येतो. आता मेट्रोवरही पहिला वहिली मेगाब्लॉक आज 8 जानेवारी 2023 घेण्यात येणार आहे. 

कधी, कुठे अन् कसा होणार बदल?

आज मेट्रोवरही मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेट्रो मार्ग 2अ आणि 7 वर सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत हा मेगा ब्लॉक असेल. हे 2 मार्ग पूर्ण क्षमतेने सुरु करायचे आहेत. म्हणून फेज 1 आणि 2 वर एकात्मिक सिग्नलिंग प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी हा मेगाब्लॉक असणार आहे. (Mumbai news local railway megablock metro Mega Block on Sunday  January 8 2023 Affected on Line 2A and 7 marathi news)

 

हेसुद्धा वाचा - Mumbai News : रविवारी घराबाहेर पडणार असाल तर आधी ही बातमी वाचा, पाहा कुठे आहे Mega Block

 

2A म्हणजे दहिसर पश्चिम ते अंधेरी पश्चिम डीएन नगर आणि 7 म्हणजे दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व...हे दोन्ही मार्गिका जानेवारी 2023 मध्ये पूर्णपणे कार्यान्वित करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

'ही' काम करण्यात येणार

पब्लिक अनाऊंसमेंट सिस्टीम, पॅसेंजर इन्फॉर्मेशन डिस्प्ले सिस्टीम, सिग्नलिंग आणि टेलिकॉम सिस्टीमसह रोलिंग स्टॉक यांसारख्या सिस्टीमची चाचणी 

दुसऱ्या टप्प्यात चाचणी होत असलेल्या तसंच वापरण्यात येणाऱ्या अद्ययावत प्रणाली सोबत पहिल्या टप्पा संरेखित करणे.

प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी संपूर्ण प्रणालीची अखंडता आणि सुरक्षितता तपासणे.