Mohan Bhagwat on Cast : सरसंघचालक मोहन भागवत (RSS Chief Mohan Bhagwat) यांनी जातीव्यवस्थेवर (Caste System) मोठं विधान केलंय. जात ही देवाने नाही तर ती पंडितांनी निर्माण केली, असं मोठं विधान भागवतांनी केलंय. देवाने नेहमीच सांगितलंय की माझ्यासाठी सर्व एक आहेत. त्यात कोणतीही जात-वर्ण नाही. पंडितांनी (Pandit) एक वर्गवारी केली जी चुकीची होती, असं भागवत म्हणाले.. मुंबईत संत रोहिदास यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमादरम्यान भागवतांनी हे विधान केलंय.
भागवतांच्या या मोठ्या विधानानंतर त्यांचा रोख कुणाकडे आहे यावरुन सोशल मीडियावर (Social Media) चर्चांना उधाण आलं. भागवतांच्या विधानामुळे दुखावल्या गेलेल्या वर्गानं सोशल मीडियावर हॅशटॅग मोहीम चालवली. त्यानंतर संघाच्या प्रचारप्रमुखांनी भागवतांच्या विधानावर स्पष्टीकरण दिलं.
सरसंघचालक मोहन भागवत जेव्हा एखादं विधान करतात तेव्हा त्यामागे नक्कीच काहीतरी हेतू असतो. त्यामुळेच त्यांच्या विधानाचे वेगवेगळे अर्थ काढले जातायत. यात आणखी एका विधानाची भर पडलीय.
देवाने नेहमीच सांगतो की माझ्यासाठी सर्व एक आहेद. त्यात कोणताही जात-धर्म नाही, पण पंडितांनी एक वर्गवारी केली जी चुकीची होती, असं मोहन भागवत यांनी म्हटलं होतं. देशात विवेक, चेतना या सर्व एक आहेत, त्यात काही फरक नाही, केवळ मतं भिन्न आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. आपल्या समाजाच्या विभाजनाचा फायदा इतरांनी घेतला आणि यातूनच देशात हल्ले झाले. बाहेरुन आलेल्यांनी याचा फायदा घेतला, असा असंही मोहन भागवत यांनी म्हटलं.
देशात हिंदू समाज उद्ध्वस्त होण्याची भीती दिसत आहे का? हे तुम्हाला कोणताही ब्राह्मण तुम्हाला हे सांगू शकत नाही. तुम्हाला समजून घ्यावं लागेल. जर प्रत्येक काम समाजासाठी असते, तर मग यात कोणी उच्च, कोणी नीच, किंवा कोणी वेगळे कसे होऊ शकतात, असं मोहन भागवत यांनी सांगितलं. मोहन भागवत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर ट्विटरवर (Twitter) #भागवत_माफी_मांगो (#Bhagwat Mafi Mango) असा ट्रेंड सुरु आहे.