Mumbai News Update: एमएमआरडीएने मुंबईतील सर्वात महत्त्वाच्या प्रकल्पाचा विस्तार केला आहे.कुर्ला ते बीकेसीपर्यंतच्या पॉड टॅक्सी प्रकल्प आता सायन रेल्वे स्थानकापर्यंत विस्तार करण्यात येण्याचा विचार आहे. मुंबईत बनणारी देशातील पहिली पॉड टॅक्सी प्रकल्पामुळं प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. मात्र काहींनी या प्रकल्पाबाबत सवाल उपस्थित केला आहे. पॉड टॅक्सीच्या प्रति किमी 21 रुपये भाडेवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसंच, पॉड टॅक्सीची अवस्थापण मोनो रेलप्रमाणेच होऊ शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
बीकेसीत मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होते. तसंच, इथे मोठं मोठी कार्यालये आणि कॉर्पोरेट ऑफिस असल्याने ऑफिसात पोहोचण्यासाठी वेळ लागतो. तसंच, रिक्षा आणि कॅबसाठीही अतिरिक्त पैसे मोजावे लागतात.पंधरा ते वीस मिनिटांच्या प्रवासासाठी पाउण तास लागतो. त्याचमुळं प्रशासनाने पॉड टॅक्सीची घोषणा केली आहे. या पॉड टॅक्सीमुळं प्रवास सोप्पा होणार आहे. या पॉ़ड टॅक्सीच्या मार्गावर 38 स्थानकं असून ही स्थानके जवळजवळ असणार आहेत. या पॉड टॅक्सीचा थांबा कुठे असणार? हे जाणून घ्या.
पॉड टॅक्सीचा पहिला टप्पा वांद्रे ते कुर्ला उपनगरीय रेल्वे स्थानकांना जोडला जाणार आहे. प्रत्येक रेल्वे स्थानकाला लागून दोन मुख्य टर्मिनल असतील ज्यात प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, ओएनजीसी बिल्डिंग, गोदरेज बीकेसी, जिओ वर्ल्ड सेंटर, भारत डायमंड बोर्स, सेबी, एनएसई, फॅमिली कोर्ट आणि कलानगर जंक्शन यासह इतर अधिक ठिकाणांशी जोडलं जाणार आहे. पॉड टॅक्सीचा पहिला टप्पा 2027 पर्यंत वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. तर, बीकेसी ते शीव रेल्वे स्थानक असा 13.5 किमीने पॉड टॅक्सीचा दुसऱ्या टप्पअंतर्गंत विस्तार केला जाणार आहे. 16 स्थानकांचा हा विस्तारित मार्ग 2041 पर्यंत कार्यान्वित केला जाणार आहे.
बीकेसी ते शीव रेल्वे स्थानक मार्ग स्थानके
न्यू मिल रोड (कुर्ला), इक्विनाॅक्स, टॅक्सीमेन काॅलनी, एमटीएनएल, टाटा कम्युनिकेशन्स, सीबीआय मुख्यालय, अंबानी स्कूल, एफआयएफसी, बीकेसी फायर स्टेशन, एमएमआरडीए मैदान, टाटा पाॅवर, एशियन हॉर्ट हाॅस्पिटल, लक्ष्मी टाॅवर्स, चुनाभट्टी, धारावी डेपो, शीव रेल्वे स्थानक