३ दिवसात मिळणार पासपोर्ट, व्हेरीफिकेशनसाठी मुंबई पोलिसांचं अॅप

मुंबईत पासपोर्ट काढणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.आता पासपोर्टच्या व्हेरीफिकेशन साठी लागणारा विलंब टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी मोबाईल अॅप तयार केलं आहे. या अॅपमुळे पोलीस व्हेरिफिकेशन फक्त तीन दिवसात करता येणार नाही.

Updated: Jul 12, 2017, 09:10 AM IST
३ दिवसात मिळणार पासपोर्ट, व्हेरीफिकेशनसाठी मुंबई पोलिसांचं अॅप title=

मुंबई : मुंबईत पासपोर्ट काढणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.आता पासपोर्टच्या व्हेरीफिकेशन साठी लागणारा विलंब टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी मोबाईल अॅप तयार केलं आहे. या अॅपमुळे पोलीस व्हेरिफिकेशन फक्त तीन दिवसात करता येणार नाही.

पासपोर्टची सगळी प्रक्रिया ऑनलाईन झाल्यामुळे आधीच लागणारा अवधी कमी झाला होता. त्यात पोलीस व्हेरिफिकेशनही ऑनलाईन झाल्यामुळे प्रक्रिया आणखी सुकर आणि जलद होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना लवकरात लवकर पासपोर्ट मिळणं शक्य होणार आहे.