मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल 'इतक्या' कोटींचं काश्मिरी चरस जप्त

याप्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून यात दोन महिलांचा समावेश आहे

Updated: Oct 26, 2021, 03:02 PM IST
मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, तब्बल 'इतक्या' कोटींचं काश्मिरी चरस जप्त title=

मुंबई : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अमलीपदार्थ विक्री करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध कारवाई सुरु आहे. आज मुंबईत एक मोठी कारवाई करण्यात आली असून दहिसर चेकनाका इथून एका गाडीतून 24 किलो काश्मिरी चरस जप्त केलं आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आलं असून यात 2 पुरुष आणि 2 महिला आरोपींचा समावेश आहे. 

मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी दहिसर चेकनाका इथे सापळा रचून ही कारवाई केली. तपासाता पोलिसांच्या हाती धक्कादायक माहिती लागली आहे. अटक करण्यात आलेले आरोप दर महिन्याला काश्मिरला जात होते. हे आरोप दर महिन्याला 25 ते 30 किलो चरस काश्मिरहून मुंबईला आणत होते. यातील मुख्य आरोपीचं नाव बंडू उदमशिळे असं असून त्यालाही पोलिसांनी अटक केली आहे. बंडू उदमशिळे याला याआधी 2010 मध्येही अटक करण्यात आली होती.

जप्त करण्यात आलेल्या चरसची आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 14 कोटी 44 रुपये इतकी किंमत असल्याचं सांगितलं जात आहे.