Mumbai Job: मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये बारावी, पदवीधरांना नोकरी; 60 हजारपर्यंत मिळेल पगार

Mumbai Port Trust Bharti: मुंबई पोर्ट ट्रस्ट अंतर्गत नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याअंतर्गत एकूण 7 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

Pravin Dabholkar | Updated: Feb 13, 2024, 02:17 PM IST
Mumbai Job: मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये बारावी, पदवीधरांना नोकरी; 60 हजारपर्यंत मिळेल पगार  title=
Mumbai Port Trust Bharti

Mumbai Port Trust Bharti: बारावी, पदवीधर असलेल्या उमेदवार चांगल्या पगाराची नोकरी शोधत असतील तर एक अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे. तुम्हाला मुंबईत मनासारख्या चांगल्या पद आणि पगाराची नोकरी उपलब्ध होत आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. त्यामुळे तुमच्या ओळखीत कोणी नोकरीच्या शोधात असेल तर त्यांच्यापर्यंत ही बातमी नक्की पोहोचवा.

मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये वेळेवेळी रिक्त पदे भरली जातात. यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येते. आता देखील नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याअंतर्गत एकूण 7 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी उमेदवारांना ऑनलाइन अथवा ऑफलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये वैद्यकीय अधिकारी आणि ऑप्टोमेट्रिस्ट ही पदे भरली 

वैद्यकीय अधिकारी 

वैद्यकीय अधिकारी म्हणजेच मेडिकल ऑफिसर पदाच्या एकूण 2 जागा भरल्या जातील. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून बीएएमएस उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराकडे बीएएमएस पदाचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे. 

Railway Job: रेल्वेमध्ये हजारो पदांची भरती, 'येथे' पाठवा अर्ज

वैद्यकीय अधिकारी पदाचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ऑप्टोमेट्रिस्ट

ऑप्टोमेट्रिस्टची 1 जागा भरली जाणार असून यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराला ऑप्टोमेट्रिस्ट पदाचा अनुभव असणे आवश्यक आहे. वैद्यकीय अधिकारी आणि ऑप्टोमेट्रिस्ट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 35 वर्षांच्या वर असू नये याची उमेदवारांनी नोंद घ्या.

ऑप्टोमेट्रिस्ट पदाचे नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा

राज ठाकरेंनी आवाहन केलेली रेल्वे भरती नेमकी काय? कुठे पाठवायचा अर्ज? जाणून घ्या

कुठे पाठवाल अर्ज?

उमेदवारांनी आपले अर्ज पहिला माळा, अॅडमिनिस्ट्रेशन ऑफिस, मुंबई पोर्ट ट्रस्ट ऑथोरीटी हॉस्पीटल, नाडकर्णी पार्क (वडाळा पूर्व) मुंबई- 400037 या पत्त्यावर पाठवायचा आहे. 22 फेब्रुवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जात काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आलेला अर्ज बाद करण्यात येईल, याची नोंद घ्या.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

युनियन बँकेत शेकडो पदांची भरती, 'ही' घ्या अर्जाची थेट लिंक