पहिल्याच पावसात 'मुंबईची तुंबई' का झाली? आदित्य ठाकरेंनी सांगितले कारण, 'पंप चालू....'

Aaditya Thackeray On Mumbai Rain: पहिल्याच पावसात मुंबईत 'हिंदमाता' विभागात पाणी साचले. यावरुनही आदित्य ठाकरेंनी पालिका प्रशासनाला जाब विचारला.

Pravin Dabholkar | Updated: Jun 10, 2024, 06:38 PM IST
पहिल्याच पावसात 'मुंबईची तुंबई' का झाली? आदित्य ठाकरेंनी सांगितले कारण, 'पंप चालू....' title=
Aaditya Thackeray On Mumbai Rain

Aaditya Thackeray On Mumbai Rain: शिवसेना आमदार, नेते आदित्य ठाकरे यांनी कोस्टल रोडवरुन राज्य सरकारवर तर मुंबईत पाणी साचल्याने पालिका प्रशासनावर निशाणा साधला आहे. कोस्टल रोड प्रकल्पातील दक्षिण मुंबईला उत्तर मुंबईशी जोडणारा मरीन ड्राइव्ह ते वरळी दरम्यानचा दुसरा बोगदा आजपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. यावर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. 

मुंबई कोस्टल रोडचे काम 2021 ला हे काम सुरू केले. मविआ सरकारच हे काम आहे. त्यावेळी पहिला टप्पा पूर्ण झाल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रिपद 500 मीटरसाठी उद्घाटनाला जात आहेत. ते आमचं काम आहे. महायुती सरकारचा काही एक संबध नाही. उलट केंद्राने आम्हाला परवागनी देताना वेळ केला होता.आम्ही जर सरकारमध्ये असतो तर डिसेंबर 2023 मध्येच रोड पूर्ण झाला असता, असे ते म्हणाले. 

अनेक राजकीय पक्षाने अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न केले. आताही करत आहेत.काही असेल तर सांगा पण कामाचा वेग कमी करु नका. बीपीटी येथे देखील पाठपुरावा करणार आहोत. पुढील दोन तीन टप्पे पूर्ण लवकर होतील, असेही ते म्हणाले.

'हिंदमाता'ला पाणी का तुंबले?

पहिल्याच पावसात मुंबईत 'हिंदमाता' विभागात पाणी साचले. यावरुनही आदित्य ठाकरेंनी पालिका प्रशासनाला जाब विचारला. मागचे 2 वर्ष आपण हे पहात आहोत. मुंबईत 15 वार्डमध्ये अधिकारी नेमले नाहीत.काल हिंदमाताचे पंप चालू केले होते का? असा प्रश्न त्यांनी विचारला. अनेक ठिकाणी पावसाळा पूर्व महापालिकेची कामे पूर्ण झालेली नाहीत. एका पावसात परिस्थिती काय झाली? असा प्रश्न त्यांनी विचारला. जे मैत्री जपतात त्यांचाच घात भाजप करते. त्यांनी दिली 'आम्हाला साथ त्यांचा केला आम्ही घात' हे भाजपचे ब्रीद वाक्य आहे पण 'प्राण जाये पण वचन ना जाये'  हे शिवसेनेचे ब्रीदवाक्य असल्याचे ते म्हणाले.  महायुतीने 400 प्लस चा नारा दिला होता ते 240 वरती आले. या देशात जनतेची 'मनकी बात' चालते. एकाची मनकी बात नाही चालत असा टोलाही त्यांनी लगावला.