मुंबई सत्र न्यायालयात पुन्हा एकदा आरोपींचा धुडगूस

सुरक्षा व्यवस्थेला चकवा देत धारदार ब्लेड न्यायालयात आणल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे.

Updated: Jun 8, 2017, 10:29 PM IST
मुंबई सत्र न्यायालयात पुन्हा एकदा आरोपींचा धुडगूस title=

मुंबई : मुंबई सत्र न्यायालयात पुन्हा एकदा आरोपींनी धुडगूस घातलाय. सुरक्षा व्यवस्थेला चकवा देत धारदार ब्लेड न्यायालयात आणल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. 

कुरार पोलिस स्टेशनचे खुनाच्या खटल्यातील आरोपींना आज मुंबई सत्र न्यायालयात आणलं होतं. उदय श्याम प्रसाद पाठक आणि कल्पेश पटेल अशी त्या दोन आरोपींची नावे आहेत. 

एका खुनाच्या प्रकरणात या दोघांना अटक करण्यात आली होती. मात्र आज झालेल्या खटल्यात कल्पेश पटेल हा माफीचा साक्षीदार होतोय अशी माहिती उदय पाठक याला मिळाली होती. त्यामुळे त्याने कल्पेशवर ब्लेडने हल्ला केला.