'इथे भाजपविरोधी लोकप्रतिनिधींना नोटीस दिल्या जातात' ईडी कार्यालयाबाहेर पोस्टर

 शिवसैनिकांनी ईडी कार्यालयाबाहेर आणखी एक पोस्टर लावलंय. 

Updated: Dec 29, 2020, 12:22 PM IST
'इथे भाजपविरोधी लोकप्रतिनिधींना नोटीस दिल्या जातात' ईडी कार्यालयाबाहेर पोस्टर title=

मुंबई : शिवसैनिकांनी ईडी कार्यालयाबाहेर आणखी एक पोस्टर लावलंय. इथे भाजपविरोधी लोकप्रतिनिधींना नोटीस दिल्या जातात असे या पोस्टरवर लिहीलंय. पोलिसांनी हे पोस्टर तात्काळ काढून घेतलंय. याआधी ईडी कार्यालयाबाहेर भाजप प्रदेश कार्यालय असे पोस्टर शिवसैनिकांनी लावले होते. त्यानंतर वादंग उफाळला होता. 

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यानंतर ईडीची नजर संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्यावर पडलीय. वर्षा राऊत यांना आज चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावण्यात आलं होतं. पण त्यांनी ईडीला पत्र लिहून आपण उपस्थित राहू शकणार नसल्याचे त्यांनी म्हटलं. या पार्श्वभुमीलक शिवसैनिक आक्रमक झालेयत. त्यांनी थेट ईडीच्या कार्यालयाबाहेर पोस्टर झळकवलाय. 

भाजप विरोधी नेत्यांना ईडी लक्ष करत असल्याचा आरोप विरोधकांकडून वारंवार होतोय. आम्ही अशा दबावांना घाबरणार नसल्याचे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आलंय. 

मी काही सांगत नसून सगळे भाजपाचे लोक सांगत आहेत. भाजपचे लोक मला ईडीची नोटीस आल्याचे सांगत आहेत. कालपासून पाहतोय अजून कोणी आलेले नाही. मी माझा माणूस भाजपाच्या कार्यालयात पाठवला आहे. कदाचित तिथे नोटीस अडकली असेल, असा टोला त्यांनी लगावला.

भाजप कार्यालयातून त्यांच्या पक्षाचा माणूस निघाला असेल तर पाहून घेऊ, असा टोला त्यांनी लगावला आहे.हे सगळं राजकारण असून ज्यांना करायचं आहे ते करु शकतात, असेही संजय राऊत यांना यावेळी सांगितलं.  मी दोन वाजता शिवसेना भवनात बोलणार आहे,  अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

दरम्यान, 'केवळ राजकारणातून ईडीची नोटीस आहे, अशी प्रतिक्रिया पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. महाविकास आघाडी कशालाही घाबरत नाही. केवळ राजकारणातून ईडीची नोटीस आहे. आदित्य ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने पाठवलेल्या नोटीसीवर आपली प्रतिक्रिया दिली.