शिवस्मारकालाही 'जीएसटी'चा फटका; खर्चात हजार कोटींहून अधिक वाढ

शिवस्मारकाच्या वाढीव खर्चात तब्बल ३०९ कोटी रुपये जीएसटीवर खर्च होणार

Updated: Dec 21, 2018, 08:55 AM IST
शिवस्मारकालाही 'जीएसटी'चा फटका; खर्चात हजार कोटींहून अधिक वाढ  title=

मुंबई : महाराष्ट्र सरकराच्या अतिशय महत्त्वकांशी सागरी शिवस्मारकाच्या खर्चात तब्बल १ हजार आठ कोटींची वाढ करण्यात आलीय. त्यासाठी विशेष शासन आदेश जारी करण्यात आलाय. शासन आदेशात विशेष म्हणजे वाढीव खर्चात तब्बल ३०९ कोटी रुपये जीएसटीवर खर्च होणार असल्याचं नमूद आलंय. त्याचप्रमाणे सुरक्षेसाठी २३६ कोटी, तर कायमस्वरुपी पाणी आणि वीजेसाठी ४५ कोटी रुपये अकस्मित खर्च ११२ कोटी रुपये धरण्यात आलंय.

संगणीकरण व्यवस्था उभारण्याव ५६ कोटी रुपये खर्च होणार आहेत. स्मारकाच्या पहिल्या टप्प्याच्या बांधकामाचा खर्च हा २६९२ कोटी रुपयांचा होता. आता यामध्ये तब्बल एक हजार ८ कोटी रुपयांनी वाढ झाली असून आता हा खर्च ३ हजार ७०० कोटी एवढा अपेक्षित आहे.

अधिक वाचा :- सिद्धार्थ पवारच्या मृत्यूला जबाबदार कोण?

शिवस्मारकाची वैशिष्ट्ये

गिरगाव चौपाटीजवळ असलेल्या १६.८६ हेक्टर आकाराच्या खडकावर हे शिवस्मारक उभारलं जाणार आहे. चौपाटीपासून ही जागा ३.६ किमी अंतरावर, नरिमन पॉईंटपासून २.६ किमी अंतरावर, तर राजभवनपासून १.२ किमी अंतरावर आहे. या स्मारकाच्या ठिकाणी प्रत्यक्ष पोहचण्यासाठी नरिमन पॉईंट, गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटी, नवी मुंबई, वर्सोवा या ठिकाणाहुन बोटीच्या  सुविधा उपलब्ध असणार आहे. एकाच वेळी जास्तीत जास्त दोन हजारपेक्षा जास्त पर्यटकांना सामावून घेण्याची या स्मारकाची क्षमता असणार आहे.

अधिक वाचा :- चीनमधल्या बुद्ध स्मारकाची उंची वाढल्यानंतर... शिवस्मारकाची उंची वाढवण्याचा निर्णय

स्मारकात प्रवेश केल्यावर राज्याची कुलदैवत आणि छत्रपती यांचे आदरस्थान असलेल्या तुळजाभवानीचे भव्य मंदिर असणार आहे...  त्यांनतर शिवाजी महाराज यांच्या जन्मापासूनचे राज्याभिषेकापर्यंत घटना दाखवणारे प्रत्यक्ष जिवंत देखावे साकारले जाणार आहेत. त्यानंतर शिवकाल उलगडवून दाखवणारे मोठे कला संग्रहालय आणि ग्रंथालयही असणार आहे. तसंच या भागांत अँपीथीअटर, साउंड अॅन्ड लाईट शो, थ्री डी आयमॅक्स थिएटर असणार आहे.

अधिक वाचा :-  'शिवस्मारक' प्रकल्प अनैतिक मार्गानं रेटला जातोय - विनायक मेटे