Dress code: 'अशा' भाविकांनाच मिळणार सिद्धीविनायकाचे दर्शन, न्यासाकडून ड्रेस कोड लागू

Siddhivinayak temple nyas Dress code: सिद्धीविनायक मंदिर न्यासाने ड्रेसकोडसंदर्भात अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Jan 28, 2025, 09:51 PM IST
Dress code: 'अशा' भाविकांनाच मिळणार सिद्धीविनायकाचे दर्शन, न्यासाकडून ड्रेस कोड लागू title=
सिद्धीविनायक मंदीर ड्रेस कोड

Siddhivinayak temple nyas Dress code: मुंबईतील सुप्रसिद्ध सिद्धीविनायक मंदिरातून एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे. तुम्ही जर सिद्धीविनायकाच्या दर्शनाला जाणार असाल तर तुम्हाला तिथल्या ड्रेस कोड नियमाची माहिती असायला हवी. अन्यथा तुम्हाला प्रवेश नाकारला जाऊ शकतो. सिद्धीविनायक मंदिर न्यासकडून ड्रेस कोड लागू करण्यात आलांय. काय आहे हा नियम? सविस्तर जाणून घेऊया.  

सिद्धीविनायक मंदिर न्यासाने ड्रेसकोडसंदर्भात अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले आहे. नागरिकांना संकोच वाटणार नाही असे कपडे भाविकांनी परिधान करावे, असे न्यासाने म्हटलंय. तसेच भारतीय पारंपारिक वेशभूषा किंवा अंगभर कपडे घातले पाहिजेत अशीही सूचना देण्यात आली आहे. अशा भाविकांनाच सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार असल्याचं पत्र मंदिर न्यासाकडून प्रसिद्ध करण्यात आलंय.

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर

मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरात देश-विदेशातील लाखो भाविक गणपतीच्या दर्शनासाठी येत असतात. गणेशोत्सवादरम्यान मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. सिद्धिविनायक मंदिर 1801 साली बांधलं गेल्याचं सांगितलं जातं. भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे. या मंदिराची बांधणीदेखील अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. मंदिरात गर्भगृहाच्या लाकडी दरवाजांवर अष्टविनायकाच्या प्रतिमा कोरण्यात आल्या आहेत. गर्भगृहाच्या आतील छतावर सोन्याचा मुलामा चढलेला असून मध्यवर्ती गणेशाची मूर्ती आहे. मंदिराच्या बाह्यभागात असलेला घुमट संध्याकाळी विविध रंगांनी उजळून निघतो.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x