मुंबई : मुंबई काँग्रेस कार्यालयावर हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या मनसे कार्यकर्त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय.
मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे, माजी नगरसेवक संतोष धुरी यांच्यासह अन्य सहा आरोपींनी जामिनासाठी किल्ला कोर्टात अर्ज केला होता. मात्र न्यायमूर्तींनी हा अर्ज फेटाळला. त्यामुळं पुढच्या १८ डिसेंबरपर्यंत सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडीतच राहावं लागणार आहे.
हा राष्ट्रीय राजकीय पक्षाच्या कार्यालयावरील हल्ला असल्यानं गुन्ह्याचं स्वरूप गंभीर आहे. या प्रकरणाचा तपास महत्वाच्या टप्प्यावर असल्यानं जामीन नाकारल्याचं सांगितलं जातंय. दरम्यान, आरोपींच्या वतीनं जामिनासाठी उद्या सत्र न्यायालयात अर्ज केला जाणाराय.