Mumbai News : आषाढी एकादशी निमित्त मुंबईतील वडाळा येथील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी नित्यनेमाने भाविक मोठी गर्दी करतात. यापार्श्वभूमीवर येथील रस्ता वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. या ठिकाणी अनेक क्षेत्रे 'नो एंट्री' झोन करण्यात आले आहे. त्यामुळे येथून प्रवास करता येणार नाही.
आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. त्यामुळे येथे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि भाविक आणि पादचाऱ्यांना मुक्तपणे आणि सुरक्षितपणे फिरता यावे यासाठी अनेक क्षेत्रे 'नो एंट्री' झोन म्हणून नियुक्त करण्यात आली आहेत.
आषाढी एकादशीच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर वडाळा येथील विठ्ठल मंदिराजवळ मोठ्या संख्येने भाविक जमा येथील, असे गृहित धरुन वाहतूक पोलिसांनी बुधवारी एक अधिसूचना जारी केली आहे, ज्यात नवीन वाहतुकीचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच येथील मार्ग बंद करताना दुसऱ्या मार्गाने वाहतूक वळवली आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि भाविक आणि पादचाऱ्यांना सहज आणि सुरक्षितपणे ये-जा करण्यासाठी अनेक क्षेत्रांना 'नो एन्ट्री' झोन म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. ते खालील प्रमाणे आहेत.
दादर टीटी ते टिळक रोड, कात्रक रोडच्या जंक्शनसह.
मंचरजी जोशी रोड आणि जाम-ए-जमशेदजी रोड, 5 गार्डन आणि टिळक रोडपर्यंत (उत्तर ते दक्षिण) विस्तारित आहे.
कात्रक रोड ते देविड बरेटो सर्कल आणि जीडी आंबेडकर मार्ग आणि टिळक रोड (उत्तर ते दक्षिण) यांचे जंक्शन.
सरफेरे चौकातून जीडी आंबेकर मार्ग (जीडी आंबेकर मार्ग आणि नायगाव क्रॉस रोडचे जंक्शन, एमएमजीएस मार्ग) कात्रक रोडकडे.
टिळक रस्ता विस्तार सहकार नगर गल्ली ते कात्रक रोड (पूर्व ते पश्चिम).
पारसी कॉलनी रोड क्रमांक 13 आणि 14, लेडी जहांगीर रोडच्या जंक्शनसह कात्रक रोड जंक्शनपर्यंत. दिनशॉ रोड आणि मंचरजी जोशी मार्ग आणि कात्रक रोडचे जंक्शन.
आषाढी एकादशीच्या निमित्ताने हा वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. आषाढी एकादशीच्या समाप्तीनंतर भाविक त्यांच्या संबंधित ठिकाणी परत जातील. मात्रा, आषाढी यात्रे निमित्ताने हे नवीन वाहतूक नियम 30 जूनपर्यंत लागू राहतील, अशी माहिती वाहतूक डीसीपी प्रज्ञा जेडगे यांनी दिली आहे.