बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर

बारावीचा निकाल लागल्यानंतर आता लगेचच पुढची प्रवेश प्रक्रिया सुरु होत आहे.

Updated: Jun 8, 2022, 06:57 PM IST
बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर  title=

मुंबई : बारावी पास विद्यार्थ्यांची (HSC Result) उद्यापासून पदवीच्या प्रथम वर्षासाठीच प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहे. मुंबई विद्यापीठाचे प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. 9 जून ते 20 जून दरम्यान ऑनलाईन किंवा ॲाफलाईन प्रवेश पूर्व अर्ज भरता येणार आहे. (Online Admission Proccess)

10 जून ते 20 जून दरम्यान पूर्व नोंदणी अर्ज सादर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना mumbai.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर  प्रवेशपूर्व नोंदणी अर्ज ॲानलाईन भरता येणार आहे. (mumbai university admission process 2022)

राज्याचा बारावीचा निकाल आज जाहीर झाला आहे. यावर्षी बारावीचा निकाल 94.22 टक्के इतका लागला आहे. निकालांमध्ये कोकण विभागाने पुन्हा बाजी मारलीये. कोकण विभागाचा निकाल 97.21 टक्के एवढा लागला आहे. तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागलाय. मुंबई विभागातून केवळ 90.91 टक्के विद्यार्थी पास झाले. 

विद्यार्थिनींचा निकाल 95.35 टक्के लागला आहे. विज्ञान शाखेचा निकाल ९८.३० टक्के लागलाय. कॉमर्सचा ९१.७१ टक्के तर आर्टसचा ९०.५१ टक्के निकाल लागला आहे.

निकाल लागल्यानंतर आता लगेचच पुढची प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. यासाठी लगेचच उद्यापासून अर्ज भरण्यासाठी सुरुवात होते आहे.