मुंबई : अनेकांना बिजी शेड्युलमुळे कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण पूर्ण करता येत नाही. जबाबदारीचं ओझं तसेच अनेक नाईलाजांमुळेही उच्च शिक्षण घेण्याची इच्छा असूनही शिक्षण घेता येत नाही. अशा वेळेस अनेक जण मुंबई विद्यापीठाच्या मुक्त आणि दूर शिक्षण (IODL Mumbai University) विभागातून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करतात. या पदव्यूत्तर शिक्षणातील एम ए या (Mumbai University M A Examiniation Result) पहिल्या आणि दुसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमाचा निकाल जाहीर झाला. यामध्ये अनेक विद्यार्थी पास झाले. यात अनेक लोकप्रिय व्यक्तीही उत्तीर्ण झाल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्राचे लाडके भाऊजी तसेच सिद्धीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकरही (Aadesh Bandekar) पास झाले आहेत. तसेच यासह अभिनेत्री आणि मधुरा वेलणकर (Madhura Velandkar) यांनीही ही परीक्षा पास केली आहे. (Mumbai University Idol announces MA Part One and Part 2 results actors Aadesh Bandekar and Madhura Velankar pass first class)
आदेश बांदेकर यांना राज्यशास्त्रात एकूण 88.5 टक्के मार्क मिळाले आहेत. तर मधुरा वेलणकर यांना मराठीत 82% टक्के गुण मिळाले आहेत. मुंबई विद्यापीठातून एमएच्या पहिल्या वर्षाचा एकूण निकाल हा 86.22 इतका लागला आहे. तर दुसऱ्या वर्षाचा निकाल हा 83.02 टक्के लागला आहे.
ऑनलाईन परीक्षा.....
कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यात विविध अभ्यासक्रमाच्या मुख्य परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. तर काही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. यानुसार मुंबई विद्यापीठाच्या एम ए पार्ट वन आणि टु च्या परीक्षाही ऑनलाईन घेण्यात आल्या. या परीक्षेत विविध मान्यवर पास झाले. यात वसई विरारचे माजी महापौर प्रवीण शेट्टींचाही समावेश आहे.
एकूण किती विद्यार्थी उत्तीर्ण?
एमए च्या पार्ट 2 या परीक्षेसाठी एकूण 3 हजार 237 उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता. त्यापैकी 3 हजार 231 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी एकूण 2 हजार 894 विद्यार्थी पास झाले.
निकाल कुठे पाहायचा?
या परीक्षेचा निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.