मुंबई विद्यापीठ पुन्हा अडकणार वादाच्या भोवऱ्यात

कायम वादात असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनावर आता पुन्हा एकदा सवाल उपस्थित होतोय. 

Updated: Dec 7, 2017, 09:44 PM IST
मुंबई विद्यापीठ पुन्हा अडकणार वादाच्या भोवऱ्यात title=

मुंबई : कायम वादात असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनावर आता पुन्हा एकदा सवाल उपस्थित होतोय. 

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये तब्बल ३६ शैक्षणिक इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र नसल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारात उघड झालीय. ६१ पैंकी ३६ इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र नसून यात शेकडो विद्यार्थी आणि कर्मचारी काम करत आहेत. 

महत्त्वाचं म्हणजे, विद्यापीठाचं विद्यार्थ्यांसाठी असलेलं कॅन्टीन, मुलामुलींचे वसतीगृह, मराठी भवन, संस्कृत भवन, नॅनो सायन्स इमारत, आयटी पार्क अशा महत्त्वाच्या इमारतींचा यात समावेश आहे. या इमारती १९७५ पासून २००८ दरम्यान बांधण्यात आल्या आहेत.

अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारात ही माहिती मागवली असून याबाबत कुलपती सी विद्यासागर राव यांना चौकशीची मागणी करण्यात आलीय.