मुंबई : मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांना दणका बसला आहे. कुलगुरुंनी बोलावलेल्या बैठका रद्द झाल्यात. मॅनेजमेंट काऊंसिल आणि सिनेट बैठक कुलगुरुंनी बोलावली होती. ही बैठक रद्द करण्यात आली आहे. सिनेटच्या बैठकीला राज्यपालांनी परवानगी नाकारली, तर मॅनेजमेंट काऊंस बैठकीला सरकारचे प्रतिनिधी गैरहजर होते.
दरम्यान मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांना राज्यपालांनी पेपर तपासणीसाठी ३१ जुलैची डेडलाईन दिली होती. उद्या म्हणजेच सोमवारी ही डेडलाईन संपत असून ती पाळणे विद्यापीठाला शक्य होणार नाही. यामुळे कुलगुरू अडचणीत येणार आहेत.
राज्यपालांनी ही बाब खूप गांभीर्याने घेतली आहे. याबाबत दोन वेळा स्वतः राज्यपालांनी कुलगुरूंना डेडलाईनची आठवण करून दिली होती.
कॉमर्स, मॅनेजमेंट आणि इतर काही अभ्यक्रमाचे निकाल आणखी रखडण्याची शक्यता आहे. ५० टक्के विद्यार्थी कॉमर्सचे आहेत, तर लॉ च्या विद्यार्थ्यांना शिकवणारे प्राध्यापक वकिली करून पेपर तपासतात.
त्यामुळे लॉ चे पेपर तपासायला वेळ लागणार त्यामुळे या शाखांचे निकाल लावण्यासाठी इतर विद्यापीठांची मदत घेतली जात आहे. मात्र इतर विद्यापीठांची मदत घेऊनही राज्यपालांनी दिलेली डेडलाईन पाळणे अवघड आहे.