मुंबईत सार्वजनिक ठिकाणी अश्लीलतेचा कळस...पाठलाग करुन आरोपी ताब्यात

या सर्व प्रकरणी पोलिसांनी या विकृताला ताब्यात घेतलं आहे.

Updated: Feb 3, 2022, 07:16 PM IST
मुंबईत सार्वजनिक ठिकाणी अश्लीलतेचा कळस...पाठलाग करुन आरोपी ताब्यात title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई  : मुंबईतून संतापजनक प्रकार समोर आला आहे. विकृत तरुणाने 32 वर्षीय महिलेला पाहून अश्लिल हावभाव केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार 2 दिवसांपूर्वीचा आहे. ही सर्व घटना पश्चिम रेल्वे मार्गावरील लोअर परळ स्टेशनवर घडली आहे. या विकृताने गुप्तांग दाखवल्याचा आरोप या महिलेने केला आहे. दरम्यान या सर्व प्रकरणी पोलिसांनी या विकृताला ताब्यात घेतलं आहे. (mumbai westran railway lower parel station young man who offensive movements police arrested) 

ताब्यात घेण्यात आलेल्या या विकृत तरुणाचं नाव शमशाद मुमताच अन्सारी असं आहे. हा तरुण कुर्ल्यातील इंदिरा नगरमधील रहिवाशी असल्याची माहिती समजत आहे.

नक्की काय झालं? 

सदर महिला ही दररोज लोअर परळ ते चर्चगेट या मार्गावरुन प्रवास करते.  हा विकृत तरुण 8-10 दिवसांपासून महिलेला पाहून अश्लिल आणि आक्षेपार्ह हावभाव करत होता.

ज्या दिवशी हा प्रकार घडला त्यावेळेस लोअर परळ रेल्वे स्थानकावर पीडितेसोबत तिचा भाऊ देखील होता.  मात्र तेव्हाही सकाळी 9 वाजून 33 मिनिटांच्या आसपास या विकृताने महिलेला पाहून अश्लिल चाळे केले, असं वृत्त एका इंग्रज वर्तमानपत्राने दिलं आहे.

त्या विकृत तरुणाने महिलेले पाहूने जे अश्लिल चाळे केले, ते पीडितेच्या भावानेही पाहिलं. तु असं का केलंस, असा जाब पीडितेच्या भावाने त्या विकृताला विचारलं.

तो विकृत तरुण घाबरला. त्याने पीडितेच्या भावाला हटकत धूम ठोकण्याचा प्रयत्न केला. यात तो यशस्वी ठरला. मात्र पीडितेच्या भावाने पाठलाग करत त्याला धरलं आणि पोलिसांच्या ताब्यात दिलं. दरम्यान हा विकृत सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.