मुंबईकरांचा रविवारचा प्रवासही कूल कूल, AC लोकलच्या 14 फेऱ्या

Mumbai AC Local News : AC लोकल रविवारीही प्रवाशांच्या सेवेत असणार आहे. मध्य रेल्वेने याबाबतचा महत्वाचा निर्णय घेत आजपासून 14 फेऱ्या सुरु केल्या आहेत. 

Updated: May 15, 2022, 11:28 AM IST
मुंबईकरांचा रविवारचा प्रवासही कूल कूल, AC लोकलच्या 14 फेऱ्या title=

मुंबई : Mumbai AC Local News : AC लोकल रविवारीही प्रवाशांच्या सेवेत असणार आहे. मध्य रेल्वेने याबाबतचा महत्वाचा निर्णय घेत आजपासून 14 फेऱ्या सुरु केल्या आहेत. 5 मेपासून AC  लोकलच्या तिकीट दरात 50 टक्के कपात करण्यात आली. यानंतर मध्य आणि  पश्चिम रेल्वेवरील AC लोकलच्या काही फेऱ्यांनाही प्रतिसाद वाढू लागला आहे. त्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांच्या सेवेत आता रविवारी  AC लोकल सुरु राहणार आहे.

 AC लोकलच्या काही फेऱ्यांनाही प्रतिसाद वाढू लागला आहे. पश्चिम रेल्वेवर आधी दिवसाला दीड ते तीन हजार तिकिटांची विक्री होत असतानाच आता पाच हजारपेक्षा जास्त तिकिटांची विक्री होते.  तिकीट दर कपातीनंतर प्रवाशांचा प्रतिसाद वाढल्याने पश्चिम रेल्वेने सोमवार, 16 मेपासून वातानुकूलित लोकलच्या आणखी 12 फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या मार्गावरील वातानुकूलित फेऱ्यांची संख्या 20 वरुन 32 होणार आहे. प्रत्येकी सहा फेऱ्या अप आणि डाऊन मार्गावर होतील. यामध्ये अप मार्गावर विरार ते चर्चगेटपर्यंत पाच फेऱ्या, एक फेरी भाईंदर ते चर्चगेट होणार आहे. तर डाऊन मार्गावर चर्चगेट ते विरार चार फेऱ्या, चर्चगेट ते भाईंदर एक आणि अंधेरी ते विरारही एक फेरी होईल.

मध्य रेल्वेवर रविवारी धावणाऱ्या AC लोकल

कुर्ला ते सीएसएमटी- प. 4.46 वा. , 9.56 वा. 
कल्याण ते सीएसएमटी- स.7.56 वा
डोंबिवली ते सीएसएमटी - प.4.55 वा and 3.24 वा
कल्याण ते दादर- स.11.22 वा
कल्याण ते सीएसएमटी- स.6.32 आणि स.3.24 वा
बदलापूर ते सीएसएमटी -दु.1.48 वा  सीएसएमटी ते कल्याण- प.5.20 वा.स.7.43, स. 10.04 आणि संध्या 6.36 वा
दादर ते बदलापूर- दु 12.30 वा
पश्चिम रेल्वेवरही आणखी 12 वातानुकूलित फेऱ्या; 16 मेपासून प्रवाशांच्या सेवेत

पश्चिम रेल्वेवर रविवारी धावणाऱ्या AC लोकल

चर्चगेट ते विरार- स.9.27 वा., दु.12.34 वा., सायं.6.11 वा., रा.11.23 वा.
चर्चगेट ते भाईंदर- दु. 3.44 वा.,
विरार ते चर्चगेट- स.7.57  वा., स.10.58 वा, दु.2.09 वा., स.7.48 वा., स.9.48 वा.
अंधेरी ते विरार- रा.8.50  वा.
भाईंदर ते चर्चगेट- सायं. 5.02 वा.