close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

ट्रेनखाली आत्महत्येच्या प्रयत्नात महिला दगावली, मुलगी वाचली

आईने त्या चिमुकलीला घेऊन ट्रेन समोर उडी मारुन देखील चिमुकलीला जीवदान मिळाले. 

Updated: May 22, 2019, 12:56 PM IST
ट्रेनखाली आत्महत्येच्या प्रयत्नात महिला दगावली, मुलगी वाचली

मुंबई : जोगेश्वरी रेल्वे स्थानकातून एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या फुटेजमध्ये एक महिला आपल्या चिमुकलीला घेऊन ट्रेनखाली जाताना दिसत आहे. हे दृश्य पाहताना काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही. दोन दिवसांपुर्वी दुपारी साधारण एक वाजण्याच्या सुमारासची ही दृश्ये आहेत. कौटुंबिक वादामुळे महिलेने हे कृत्य केल्याचे समोर आले. तिने चिमुकल्या 9 महिन्याच्या मुलीसह धावत्या लोकल ट्रेन पुढे स्वतःला झोकून देत आत्महत्या केली. मात्र या घटनेमध्ये ती महिला दगावली असली तरी तिची चिमुकली मात्र आश्चर्यकारकरित्या वाचली आहे. 

जोगेश्वरीच्या रेल्वे फलाटावर दुपारच्या वेळेस जास्त गर्दी नव्हती. अशावेळी आपल्या मुलीला कडेवर घेत वेगाने येणाऱ्या रेल्वेसमोर स्वत:सह मुलीलाही झोकून दिले. फलाटावर जास्त वर्दळ नसल्याने तिला कोणीही वाचवूही शकले नाही. पण ट्रेन तिच्या अंगावरून निघून गेल्यानंतर लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. यात तिची मुलगी जिवंत असल्याचे समोर आले. ही धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. 

जन्मदाती आई त्या चिमुकलीला मृत्यूकडे घेऊन गेली मात्र नियतीला ते मान्य नव्हते हेच दिसून आले. आईने त्या चिमुकलीला घेऊन ट्रेन समोर उडी मारुन देखील चिमुकलीला जीवदान मिळाले. त्या महिलेने कौटुंबिक वादातून आत्महत्या केली असल्याचे प्राथमिक माहीतीत समोर येत असले तरी हा मार्ग योग्य नव्हे अशी प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.