मुंबई : मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गैरव्यवहार झी २४ तासने समोर आणल्यानंतर आता नाबार्डनेही आपल्या चौकशी अहवालामध्ये या गैरव्यवहारावर शिक्कामोर्तब केलंय.
मुंबै बँकेतला गैरव्यवहार यापूर्वीही झी २४ तासने समोर आणला होता, परंतु त्यातून कुठलाही धडा न घेता राज्य आणि केंद्रातल्या सत्तेच्या जोरावर पदाधिका-यांनी पुन्हा एकदा गैरव्यवहारांचा उच्चांक तयार केलाय...
आता खुद्द नाबार्डनेच गैरव्यवहारावर शिक्कामोर्तब केल्यानं भाजप आमदार आणि बँकेचे अध्यक्ष प्रविण दरेकरांसमोरच्या अडचणी वाढल्यायत..