नारायण राणे यांची CM उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका, पाहा काय म्हणाले ते...

केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या नेतृत्वाखाली आजपासून भाजपची जनआशीर्वाद यात्रा (BJP Jan Ashirwad Yatra)  सुरु झाली आहे.  

Updated: Aug 19, 2021, 12:43 PM IST
नारायण राणे यांची CM उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका, पाहा काय म्हणाले ते... title=
संग्रहित छाया

मुंबई : केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या नेतृत्वाखाली आजपासून भाजपची जनआशीर्वाद यात्रा (BJP Jan Ashirwad Yatra)  सुरु झाली आहे. ही यात्रा दादर इथल्या बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मारक स्थळीही येणार असल्याने यावेळी शिवसेना (Shiv Sena) - भाजप (BJP) राडा पुन्हा होतो का याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. दरम्यान, राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला मुंबईतून सुरुवात होण्यापूर्वी विमानतळावर भाजपने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. त्यानंतर राणे यांनी शिवसेना आणि राज्यातील सरकारवर हल्लाबोल चढवला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) राज्याला उध्वस्त करत असल्याची राणे यांनी टीका केली आहे. (Narayan Rane criticized on Chief Minister Uddhav Thackeray)

यावेळी बोलताना नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. राज्यातली जनता महाराष्ट्रातील आत्ताच्या सरकारला कंटाळली आहे. हे सरकार राज्याचा कोणताही विकास करू शकत नाही, अशी टीका राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. यावेळी देवेंद्र फडणवीस, आशिष शेलार यांच्यासह भाजपाचे राज्यातील प्रमुख नेतेमंडळी देखील राणे यांच्या स्वागतासाठी उपस्थित होते. 

आता राज्यात भाजपचे सरकार येणार आहे. भाजपच विकास करु शकतो, असा दावा राणे यांनी यावेळी केला.  जनतेसाठी भाजप आशेचा किरण असल्याचे ते म्हणाले. उद्धव ठाकरे नावाप्रमाणेच राज्याला उद्ध्वस्त करायला निघाले आहेत. म्हणून जनता आशेचा किरण म्हणून राज्यात भाजपची सत्ता यावी अशी अपेक्षा ठेऊन आहे. त्यामुळेच यात्रेला उपस्थिती दिसत आहे, असा दावा त्यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादानेच मंत्रिमंडळात आहे. मला मंत्रिपद दिल्याबद्दल पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे त्यांनी यावेळी आभार मानले. मोदी यांच्या आशीर्वादाने मी केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी झालो आहे. मी मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांचा ऋणी आहे. त्यांनी मला दिल्लीत मंत्रिमंडळात जाण्याची संधी उपलब्ध करून दिली, असे ते म्हणाले.

दरम्यान, शिवाजी पार्क इथं भाजपकडून झेंडे आणि पोस्टर्स लावण्यात आले होते. ते मुंबई महापालिकेने हटविले आहेत.