राणेंनी दिलेत भाजप प्रवेशाचे स्पष्ट संकेत

काँग्रेस पक्षाचा राजीनामा देणाऱ्या नारायण राणे यांनी भाजप प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याकडं आपण भेटीसाठी वेळ मागितलीय. 

Updated: Sep 22, 2017, 10:17 PM IST
राणेंनी दिलेत भाजप प्रवेशाचे स्पष्ट संकेत title=

मुंबई : काँग्रेस पक्षाचा राजीनामा देणाऱ्या नारायण राणे यांनी भाजप प्रवेशाचे स्पष्ट संकेत दिले आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्याकडं आपण भेटीसाठी वेळ मागितलीय. 

कोकणातील हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी यावे, अशी आपली इच्छा आहे, असं नारायण राणे यांनी 'झी २४ तास'ला दिलेल्या पहिल्याच रोखठोक मुलाखतीत स्पष्ट केले.

नारायण राणे यांनी कॉंग्रेस सोडल्याची अधिकृत घोषणा गुरूवारी केली. कुडाळ येथे त्यांनी आपला निर्णय जाहीर केला. एकेकाळी शिवसेनेचे प्रमुख नेते असलेल्या राणेंनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा हा घेतलेला दुसरा निर्णय. यापूर्वी त्यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केले होते.

पक्षातून बाहेर पडत असल्याची घोषणा करताना राणे यांनी पक्षातील पदाचा आणि आमदारकीचाही राजीनामा दिला. या वेळी राणे यांनी आपल्या आपल्या खास शैलीत कॉंग्रेसवर निशाणा साधला. कॉंग्रेसवर हल्ला चढवला. तसेच नीलेश राणेंनी काँग्रेसचा त्याग केलाय.