जानेवारीआधीच मंत्रिमंडळात राणेंना स्थान मिळणार

राज्यात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याचे संकेत आज पुन्हा मिळालेत. जानेवारीआधीच हा विस्तार होणार आहे. त्यामुळे याच महिन्यात किंवा पुढील महिन्यात हे संकेत मिळत आहे.

Updated: Nov 11, 2017, 07:57 PM IST
जानेवारीआधीच मंत्रिमंडळात राणेंना स्थान मिळणार title=

मुंबई : राज्यात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याचे संकेत आज पुन्हा मिळालेत. जानेवारीआधीच हा विस्तार होणार आहे. त्यामुळे याच महिन्यात किंवा पुढील महिन्यात हे संकेत मिळत आहे.

जानेवारीआधीच होणार राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांचाही मंत्रिमंडळात समावेश होणार  आहे, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी झी मीडियाला दिली.

वर्ष संपण्याआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून नारायण राणे यांचाही मंत्रिमंडळात समावेश होईल, असं विधान राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय. झी मीडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मुनगंटीवार बोलत होते. शिवसेना सत्ता आणि भाजपची साथ सोडणार नसल्याचेही मुनगंटीवार यांनी म्हटलंय. 

दरम्यान, राणे यांच्या मंत्रिमंडळा प्रवेशाला शिवसेनेचा विरोध असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे राणेंना मंत्रिमंडळात स्थान दिल्यानंतर शिवसेना काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलेय. मात्र, भाजपची साथ शिवसेना सोडणार नाही, अशी भूमिका सुधीर मुनगंटीवार यांनी मांडल्याने सेनेची काय भूमिका असेल, याची प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही.