विमानातून फिरताना 100 फूट बर्फाखाली सापडले 60 वर्षांपूर्वी गायब झालेले गुप्त शहर; भविष्यातील मोठ्या संकटाचे संकेत

 Camp Century City In Greenland :  उत्तर ग्रीनलँड 60 वर्षांपूर्वी गायब झालेले गुप्त शहर सापडले आहे. हे शहर भविष्यातील मोठ्या संकटाचे संकेत मानले जात आहे.   

वनिता कांबळे | Updated: Dec 4, 2024, 08:39 PM IST
 विमानातून फिरताना 100 फूट बर्फाखाली सापडले 60 वर्षांपूर्वी गायब झालेले गुप्त शहर; भविष्यातील मोठ्या संकटाचे संकेत   title=

Nasa Discovers Camp Century City In Greenland :  जगभरातील अनेक शहरं अनेक देश हे गायब झाले आहे. ग्रीनलँडमध्ये 60 वर्षांपूर्वी गायब झालेले गुप्त शहर सापडले आहे. हे शहर 100 फूट बर्फाखाली दबले गेले होते. NASA चे संशोधक अंटार्कटिका बर्फाळ प्रदेशात गल्फस्ट्रीम III जेट या खास विमानातून या प्रदेशाचे निरिक्षण करत होते. यावेळेस या शहराचे अवशेष सापडले आहे. या शहराचा शोध हा भविष्यातील संकटांचे संकेत असल्याचे बोलले जात आहे.

हे देखील वाचा...  23 विमानतळं असलेले भारतातील एकमेव राज्य, नाव ऐकून शॉक व्हाल, 5 इंटरनॅशनल आणि 18 डोमॅस्टिक एअरपोर्ट...

नासाच्या संशोधकांचे एक पथक गल्फस्ट्रीम III जेट एप्रिल 2024 मध्ये उत्तर ग्रीनलँडच्या प्रदेशातून उड्डाण करत होते. यावेळी प्रगत रडार उपकरण UAVSAR च्या माध्यामातून या प्रदेशाचे निरीक्षण केले जात होते. विशेषत: बर्फाची जाडी मोजण्यासाठी  UAVSAR रडारचा वापर केला जातो. बर्फात गाडले गेलेले शहर UAVSAR च्या रडारवर आले. शास्त्रज्ञांनी रडारने घेतलेल्या प्रतिमांचे अधित बारकाईने निरिक्षण केले असता हे शहर शीतयुद्ध दरम्यान म्हणजेच साधारण 60 वर्षांपूर्वी अस्तित्वात होते असा दावा केला जात आहे.

कॅम्प सेंच्युरी असे या शहराचे नाव आहे. हे शहर म्हणजे एक लष्करी तळ होता. 1959 मध्ये हे शहर उभारले गेले.  ग्रीनलँड बर्फाच्या पृष्ठभागाखाली बोगदे खोदून या शहराची निर्मीती करण्यात आल्याचे सांगितले जाते. येथे वास्तव्यास असलेल्या लोकांनी 1967 मध्ये हे शहर सोडल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.  तेव्हापासून या शहरावर बर्फ साचत आहे. शहराच्या पृष्ठभागाच्या वर किमान 30 मीटर बर्फ साचलेला आहे. म्हणजेच हे शहर 100 फूट बर्फाखाली गाडले गेले आहे. ग्रीनलँडच्या विविध प्रदेशात बर्फाची जाडी मोजताना हे शहराच्या खाणाखुणा सापडल्याचे नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीचे (जेपीएल) ॲलेक्स गार्डनर यांनी सांगितले. 

 UAVSAR ने घेतलेल्या छायचित्रांच्या मदतीने कॅम्प सेंच्युरी शहराचा 3D मॅप तयार करण्यात आला आहे. या मॅपमध्ये शहराची रचना तसेच भुयारी मार्ग दिसत आहेत. या शहराच्या शोधामुळे भूतकाळातील रहस्ये उलगडली नाहीत, तर भविष्यात होणारा हवामान बदल आणि समुद्र पातळीत होणारी वाढ याच्या अभ्यासाला नवी दिशा मिळाली. बर्फात गाडले गेलेले हे शहर भविष्यातील संकटाचे संकेत असल्याचे देखील बोलले जात आहे.