जात प्रमाणपत्र रद्द : मुंबई हायकोर्टाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर नवनीत राणांएवढा इतरांनाही मोठा धक्का

मुंबई हायकोर्टाचा नवनीत राणा यांचं जातप्रमाणपत्र रद्द करण्याचा आदेश ऐतिहासिक आहे, कारण यामुळे जातप्रमाणपत्राविरोधात प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये तक्रारदारांच्या आशा पल्लवीत झाल्या 

Updated: Jun 8, 2021, 04:40 PM IST
जात प्रमाणपत्र रद्द : मुंबई हायकोर्टाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर नवनीत राणांएवढा इतरांनाही मोठा धक्का title=

मुंबई : मुंबई हायकोर्टाचा नवनीत राणा यांचं जातप्रमाणपत्र रद्द करण्याचा आदेश ऐतिहासिक आहे, कारण यामुळे जातप्रमाणपत्राविरोधात प्रलंबित असलेल्या प्रकरणांमध्ये तक्रारदारांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत, तर ज्यांच्याविरोधात अशा तक्रारी आहेत त्यांचे धाबे दणाणले आहे. नवनीत राणा यांचं जातप्रमाणपत्र मुंबई हायकोर्टाने रद्द ठरवल्यानंतर, त्यांची खासदारकी तर धोक्यात आलीच आहे, पण संपूर्ण राज्यातील राजकारणात हा चर्चेचा विषय ठरला आहे. कारण जात प्रमाणपत्राविषयी अनेक ठिकाणी उमेदवारांविरुद्ध कोर्टात केसेस आहेत, तसेच प्रशासनाकडे तक्रारी आहेत.

नवनीत राणा यांचं जातप्रमाणपत्र मुंबई हायकोर्टाने रद्द ठरवला आणि २ लाखांचा दंड ठोठावण्याचा जो आदेश दिला आहे, त्यानंतर ज्या -ज्या उमेदवारांनी जातप्रमाणपत्र विरोधात विरोधी उमेदवारांच्या तक्रारी केल्या आहेत त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे नवनीत राणांपेक्षा इतरांनाही मुंबई हायकोर्टाचा निकाल हा मोठा धक्का आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र मुंबई हायकोर्टाने रद्द केलं आहे. यामुळे नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहेत. राजकारणात महिलांना खूप परिश्रम करावं लागतं. मी राजकारणात मागील ९ वर्षापासून आहे. 

या संपूर्ण प्रकरणात काही तरी राजकीय खिचडी शिजवली गेली आहे, कोर्टात सुनावणीला ही केस अशी अचानक येणे, म्हणजेच काहीतरी राजकारण आहे. या निकालाविरोधात मी सुप्रीम कोर्टात जाणार आहे. 

माझी खासदारकी शाबूत राहिली याची मला १०० टक्के गारंटी आहे. कोर्टाने जो निर्णय दिला आहे त्याचा मी पूर्ण आदर करते असं देखील नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. 

दुसरीकडे शिवसेनेचे उमेदवार आणि नवनीत राणा यांचे विरोधक आनंदराव अडसूळ यांच्या समर्थकांनी पेढे वाटून आणि गुलाल उधळून आनंद व्यक्त केला आहे. आनंदराव अडसूळ यांनी ही याचिका दाखल केली होती, नवनीत राणा यांना कोर्टाने २ लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे.