नवदुर्गा : गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी झटणारी आजची 'हिरकणी'

कृतज्ञता स्त्रीच्या कतृत्वाची 

Updated: Oct 19, 2020, 04:42 PM IST
नवदुर्गा :  गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी झटणारी आजची 'हिरकणी' title=

मुंबई : नवरात्रोत्सवाचा आजचा तिसरा दिवस. आज आपण भेटणार आहोत तिसऱ्या दुर्गास्वरुप असलेल्या  सुवर्णा वायंगणकर यांना. गड किल्ल्यांचे संवर्धन आणि आपल्या संस्कृतीच जतन करणाऱ्या 'सुवर्णा वायंगणकर' सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 'परुळे' गावच्या सुवर्णाताई कामानिमित्त मुंबईत राहतात.

मुंबईत या पेशंट केअर टेकरचे काम करतात आणि त्यातून वेळ काढून गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी ट्रेकिंग,क्लांयबिंग,रॅपलिंग, असेच साहसी खेळ करून त्या गड संवर्धन करण्याचे काम करतात. त्याचं वैशिष्ट्य म्हणजे आपले संस्कृतीत असणारी नऊवारी साडी नेसून त्या ट्रेकिंग  करतात आणि आपली संस्कृती जपतात. अशा या रणरागिनीला आपण आजची हिरकणी म्हणून शकतो. 

नवरात्रोत्सवात 'नवदुर्गा' या सीरिजमध्ये आपण अशाच नऊ स्त्री शक्तींना आपण भेटणार आहोत.