मुंबई : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांच्याकडे नवी जबाबदारी देण्यात दिली जावू शकते. मलिक यांची राष्ट्रवादी मुंबई अध्यक्षपदावर नेमणूक करण्यात येऊ शकते. राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांच्या शिवसेना पक्षप्रवेशामुळे ही जागा रिक्त झाली होती. नवाब मलिक हे पक्षाचे उपाध्यक्ष आहेत. तसेच राष्ट्रीय प्रवक्ते देखील आहेत.
'मुंबईत विधानसभा निवडणुकीत यश मिळणार नाही हे लक्षात आल्यावर सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. परंतु, शिवसेनेने पडणारा नेता घेतला आहे. आम्ही मुंबईत नव्याने पक्ष उभा करू आणि राष्ट्रवादीची ताकद दाखवून देऊ.' अशी प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी अहिर यांच्या शिवसेना पक्षप्रवेशावर दिली आहे.
मुंबईत विधानसभा निवडणुकीत यश मिळणार नाही हे लक्षात आल्यावर सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. परंतु, शिवसेनेने पडणारा नेता घेतला आहे. आम्ही मुंबईत नव्याने पक्ष उभा करू आणि राष्ट्रवादीची ताकद दाखवून देऊ. #IndianPolitics #NCP @NCPspeaks pic.twitter.com/H5mH5GaiBj
— Nawab Malik (@nawabmalikncp) July 25, 2019
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अहिर यांच्या सेना प्रवेशामुळे राष्ट्रवादीला मोठी खिंडार पडली आहे. निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पक्ष सोडला आहे.
जो जिंदा होते है वह प्रवाह के विरुद्ध तैरते है !
मुर्दा लोग पानी के साथ बह जाते है !
साथीयो जिंदा हो तो जिंदा नजर आना जरुरी है !
जय हिंद
जय राष्ट्रवाद pic.twitter.com/022NDw0jyl— Nawab Malik (@nawabmalikncp) July 25, 2019
अजित पवारांची टीका
सचिन अहिर यांच्या शिवसेना पक्षप्रवेशावर अजित पवारांनी टीका केली आहे. काही नेतेमंडळीना चौकशीची तर काहींना पराभवाची भीती आहे. या भीतीपोटी हे नेते पक्ष सोडत असल्याची प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.