Ajit Pawar Speech in NCP Meet: आज अजित पवारांचा (Ajit Pawar) वांद्रे इथे एमईटीत भव्य मेळावा होतोय. यावेळी बोलताना अजित पवार यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर हल्लाबोल केला. एखादा माणूस सरकारी नोकरीत लागला तर 58 व्या वर्षी निवृत्त होतो. आयएस, आयपीएस असेल तर साठाव्या वर्षी निवृत्त होतो. राजकीय जीवनात असा तर भाजपामध्ये (BJP) 75 व्या वर्षी निवृत्त केलं जातं. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशींचं उदाहरण घ्या. आता नवीन पिढी पुढे येतेय, आता तुम्ही आशिर्वाद द्या ना. तुम्ही चूक लक्षात आणून द्या, चूक मान्य करत दुरुस्त करुन पुढे जाऊ, असं सांगत अजित पवार यांनी आता तुमचं वय 82 झाले तुम्ही थांबणार आहे का नाही. तुम्ही शतायुष्य व्हा, असं म्हटलं. तसंच माझी काय चूक? मला का नेहमी जनतेसमोर व्हिलन करता असा सवालही अजित पवारयांनी
राष्ट्रवादीवर ही वेळ का आली?
ही वेळ आपल्यावर राष्ट्रवादीवर का आली? मी राजकीय जीवनामध्ये काम करत असताना साहेबांच्या छत्रछायेखाली आणि मार्गदर्शनाखाली तयार झालो. घडलेलो आहे. त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये तीळमात्र शंका नाही. साहेब आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आहे. त्याबद्दल आमचा प्रत्येकाचे तेच मत आहे. पण, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. एकंदरीतच आज काय राज्य पातळीवर राजकारण चाललंय. शेवटी एखादा पक्ष आपण कशाकरता स्थापन करतो. लोकांची विकासाची कामी होण्याकरता. सर्व जाती-धर्माला न्याय देण्यासाठी काम पक्ष करतो.
2019 साली भाजपबरोबर सरकार बनवण्यासाठी एका मोठ्या उद्योगपतीच्या घरी फडणवीसांबरोबर पाच बैठक झाल्या, शेवटच्या क्षणी वरिष्ठांकडून निर्णय फिरवण्यात आला असं सांगत 2019 च्या शपथविधीवर अजित पवारांकडून पहिल्यांदाच गौप्यस्फोट करण्यात आला. 2004 ला आलेली संधी सोडली नसती तर मी आज 2023 मध्ये सांगतोय आतापर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचाच मुख्यमंत्री असता असं अजित पवार यांनी सांगितलं. विरोधकांमध्ये बसून काही निर्णय होत नाही. सत्तेमध्ये काम करून लोकांचे प्रश्न सोडवता येत असतील तर का सोडायचे नाही? असं अजित पवार यांना सांगितलं
पडद्यामागे काय घडलं?
2014ला आम्ही सिल्व्हर ओकला होतो. त्यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं आम्ही भाजपला बाहेरून पाठिंबा देऊ. आम्ही शांत बसलो. कारण वरिष्ठांचा निर्णय होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. आम्हाला सांगितलं वानखेडेला शपथविधीच्या कार्यक्रमाला हजर राहा. तिथे आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटले. पण भाजपसोबत जायचं नव्हतं तर आम्हाला तिकडे का पाठवलं? शपथविधीला का पाठवलं? 2017ला वर्षा बंगल्यावर चर्चा झाली. सुनील तटकरे, मी, जयंत पाटील होते. सुधीर मुनगंटीवार, फडणवीस, विनोद तावडे, चंद्रकांत तावडे हे लोक होते. कोणती खाती, कोणती पालकमंत्रीपदं असतील हे ठरलं. मी कधीही खोटं बोलत नाही. खोटं बोललो तर पवारांची औलाद ठरणार नाही, असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी केला.
2019 साली आपले वरिष्ट नेते, प्रफुल पटेल, अजित पवार आमची फडणवीसांसमवेत एका उद्योजकाच्या घरी मिटिंग झाली. मला कोणास बदनाम होऊ द्यायचे नाही. पण अचानक बदल झाला सेना सोबत जायचे ठरलं. 2017 मध्ये सेना जातीयवादी झाला आणि दोन वर्षात अस काय झाले की सेनेसोबत जायचं ठरलं? असा सवालही अजित पवार यांनी विचारलाय.