शिवसेना म्हणजे गुळाच्या ढेपीला चिकटलेला मुंगळा- अजित पवार

 राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेला गुळाच्या ढेपीला चिकटलेल्या मुंगळ्याची उपमा दिली आहे. 

Updated: Jun 16, 2017, 06:33 PM IST
शिवसेना म्हणजे गुळाच्या ढेपीला चिकटलेला मुंगळा- अजित पवार title=

जयवंत पाटील, झी मीडिया, मुंबई : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिवसेनेला गुळाच्या ढेपीला चिकटलेल्या मुंगळ्याची उपमा दिली आहे. 

शिवसेनेची परिस्थिती ही गुळाच्या ढेपीला, म्हणजे सत्तेला चिकटलेला मुंगळ्याप्रमाणे झाली असल्याचं अजित पवारांनी म्हटलं आहे, आणि हा मुंगळा आता सत्ता सोडणार नसल्याचं अजित पवार यांनी ट्ववीट करून म्हटलं आहे.

मध्यावधील निवडणुकांवर बोलताना ट्ववीटरवर अजित पवार म्हणाले, 'मध्यावधी होईल की नाही ते सांगायला आम्ही काही ज्योतिष नाही. पण शिवसेना सत्ता सोडणार नाही, हे नक्की!'

दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी 'मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता नाही. तरी पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी २०१९ ची तयारी आतापासूनच सुरू करावी, असं म्हटलं आहे.