close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

निवडणूक निकालाआधीच काँग्रेस-राष्ट्रवादीत घमासान

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान पार पडलं.

Updated: Oct 22, 2019, 01:15 PM IST
निवडणूक निकालाआधीच काँग्रेस-राष्ट्रवादीत घमासान

मुंबई : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी काल मतदान पार पडलं. २४ ऑक्टोबरला या निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. पण निवडणुकीनंतर जाहीर झालेल्या सगळ्याच एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा भाजप-शिवसेना महायुतीचं सरकार येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यानंतर आता काँग्रेस-राष्ट्रवादीत घमासान सुरु झालं आहे. जर महाराष्ट्रात आघाडीचा पराभव झाला तर त्याला काँग्रेस जास्त जबाबदार असेल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेमन म्हणाले आहेत.

'शरद पवारांना राज्यात चांगला प्रतिसाद मिळाला. पण काँग्रेसकडून नरमी दाखवण्यात आली. राहुल गांधींनी मुंबईत काही दौरे केले, पण काँग्रेस नेत्यांनी खास मेहनत केली नाही. जर आम्हाला यश मिळालं नाही, तर त्याला काँग्रेस जबाबदार असेल,' अशी प्रतिक्रिया माजिद मेमन यांनी दिली.

'आकडे येतील, तेव्हा चित्र स्पष्ट होईल. २४ तारखेपर्यंत आपल्याला थांबावं लागेल. पण कुठे ना कुठे पराभवाची जबाबदारी आमचीही असेल. ईडीचा आपल्या फायद्यासाठी दुरुपयोग करणं चुकीचं आहे,' असं वक्तव्य मेमन यांनी केलं. 

वेगवेगळ्या एक्झिट पोलचे अंदाज